Pathaan | अत्यंत कमी पैशांमध्ये पठाण चित्रपट पाहण्याची संधी, विक्रमी कमाईनंतर पठाण चित्रपटाची तिकिटे होणार स्वस्त
दीपिका पादुकोण हिने पठाण चित्रपटाच्या रेकाॅर्ड ब्रेक कामगिरीवर म्हटले होते की, कोणताही रेकाॅर्ड तोडण्यासाठी आम्ही चित्रपट तयार केला नव्हता.
मुंबई : शाहरुख खान याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर तूफान कमाई करतोय. पठाण या चित्रपटाला रिलीज होऊन फक्त सहा दिवस झाले असून चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. पठाण चित्रपटाची जबरदस्त अशी कामगिरी पाहून बाॅलिवूडच्या अनेकांनी शाहरुख खान याच्यासह दीपिका पादुकोण हिचे देखील काैतुक केले. पाच दिवसांमध्ये जगभरातून पठाण चित्रपटाने तब्बल ५०० कोटींचे कलेक्शन केले आहे. नुकताच शाहरुख खान याने चित्रपट (Movie) रिलीज होताना त्याच्या मनात नेमके काय सुरू होते, हे सांगून टाकले आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणाला की, काहीही झाले तरीही चित्रपट रिलीजच्या वेळी कुठेच गोंधळ होऊ नये हीच माझी भावना होती. मी चित्रपट सर्वांसाठी तयार करतो. चित्रपटाच्या पात्रातून फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे हीच माझी भावना असते. कोणाच्याही भावना दुखवण्याचा अजिबात उद्देश नव्हता. दीपिका पादुकोण हिने पठाण चित्रपटाच्या रेकाॅर्ड ब्रेक कामगिरीवर म्हटले होते की, कोणताही रेकाॅर्ड तोडण्यासाठी आम्ही चित्रपट तयार केला नव्हता.
नुकताच पठाण चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट पुढे येत आहे. मिड डेच्या रिपोर्टनुसार सोमवारपासून पठाण चित्रपटाचे तिकिटांचे दर कमी होणार आहेत. पठाणच्या टीमकडून चाहत्यांना हे मोठे गिफ्ट देण्यात येणार आहे.
चित्रपटाचे जरी तिकिट कमी झाले तरीही याचा फायदा हा चित्रपटालाच होईल, असे सांगण्यात येतंय. चित्रपटाचे दर पंचवीस टक्क्याने कमी होणार आहेत. म्हणजेच ज्या लोकांनी अजूनही पठाण हा चित्रपट बघितला नाही, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.
पठाण चित्रपटाची फक्त देशामध्ये नाहीतर विदेशामध्येही मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. या चित्रपटाने विदेशामध्येही मोठे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद निर्माण झाला होता.
पठाण या चित्रपटाने ओपनिंग डेला जबरदस्त कामगिरी करत भारतामधून ५४ कोटींचे कलेक्शन केले. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ६८ कोटींचे कलेक्शन केले. रविवारी चित्रपटाने तब्बल ७० कोटींचे कलेक्शन केले.