दिशा पाटनी नव्हे टायगर श्रॉफला आवडते ‘ही’ अभिनेत्री, चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाला…

नुकतेच टायगरने इन्स्टाग्रामवर त्याच्या फॅन्सशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. एका चाहत्याने टायगरला प्रश्न विचारला की, तुमची आवडती अभिनेत्री कोण आहे सर? टायगर दिशाचं नाव घेईल, असं चाहत्यांना वाटलं, पण तसं झालं नाही.

दिशा पाटनी नव्हे टायगर श्रॉफला आवडते ‘ही’ अभिनेत्री, चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाला...
दिशा-टायगर
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 8:56 AM

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) यांच्या नात्याच्या जाहीर चर्चा आता सवयीच्या झाल्या आहेत. ही जोडी नेहमी एकत्रितपणे सुट्ट्या, पार्टी आणि डेटवर जाते. मात्र, अद्यापही या दोघांनी आपल्या नात्याची पुष्टी केलेली नाही. जरी टायगर आणि दिशा यावर शिक्कामोर्तब करत नसले तरी, त्यांच्या चाहत्यांना हे माहित आहे की दोघे एकमेकांना डेट करत आहेत (Tiger Shroff Ask me anything session actor reveals his favorite actress name).

वैयक्तिक आयुष्यात एकमेकांसोबत राहण्याव्यतिरिक्त दोघांनीही एकत्र काम केले असून, चाहत्यांना त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री खूप आवडते. दिशाची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. ती बर्‍याच लोकांची आवडती अभिनेत्री आहे, पण तुम्हाला हे माहिती आहे का की, टायगरची आवडती अभिनेत्री दिशा नाहीय!

कोण आहे टायगरची आवडती अभिनेत्री?

वास्तविक, नुकतेच टायगरने इन्स्टाग्रामवर त्याच्या फॅन्सशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. एका चाहत्याने टायगरला प्रश्न विचारला की, तुमची आवडती अभिनेत्री कोण आहे सर? टायगर दिशाचं नाव घेईल, असं चाहत्यांना वाटलं, पण तसं झालं नाही. त्याने उत्तर दिले, ‘माधुरी दीक्षित मॅम’. आता टायगरच्या या उत्तरामुळे दिशाला मात्र नक्कीच वाईट वाटलं असेल.

Tiger 2

टायगरबरोबर फुटबॉल खेळण्यासाठी पोहोचली दिशा

साधारणपणे बॉलिवूडचे अनेक कलाकार एकत्र फुटबॉल सामने खेळतात. ज्यात टायगर, रणबीर कपूर, अर्जुन कपूर यांचा सहभाग असतो. पण, अलीकडेच दिशा पाटनी टायगरबरोबर फुटबॉल खेळायला आली होती. दोघेही बराच वेळ एकत्र फुटबॉल खेळत होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

दिशा म्हणते टायगरला इम्प्रेस करायचेय!

दिशाला एकदा टायगरशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल एकदा विचारले गेले होते. तेव्हा ती म्हणाली, ‘मी बर्‍याच वर्षांपासून त्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘भारत’ या चित्रपटात मी बरेच स्टंट केले, मला वाटले की ते पाहिल्यावर तो इम्प्रेस होईल, पण तसे झाले नाही. होय, आम्ही एकत्र जेवायला बाहेर जातो, परंतु याचा अर्थ असा नाही की. तो माझ्यावर इम्प्रेस झाला आहे. आपण पुढच्या वेळी त्याला हा प्रश्न विचारा. आम्ही दोघेही खूप लाजाळू आहोत.’

दोघांचे व्यावसायिक आयुष्य

टायगर आणि दिशाच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचे तर, टायगरच्या हातात अजूनही बरेच चित्रपट आहेत. तो ‘हिरोपंती 2’, ‘रॅम्बो’, ‘गणपत’, ‘बागी 4’ मध्ये दिसणार आहे.

तर, दिशा पाटनी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ आणि ‘के टीना’मध्ये झळकणार आहे. मात्र, चाहत्यांना टायगर आणि दिशाची जोडी पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीनवर बघायची आहे.

(Tiger Shroff Ask me anything session actor reveals his favorite actress name)

हेही वाचा :

Photo : Alessandro चा गेटअप, रणवीर सिंहच्या नव्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत अफेअर आहे का? पूजा बेदीची मुलगी म्हणते, “आम्ही तर…”

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.