‘भेडिया’चा थरारक टीझर रिलीज, पाहा वरुण धवनचा खतरनाक लूक…
वरुण धवनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भेडिया चित्रपटाचा टीझर रिलीज केलाय. यासोबतच वरुणने चित्रपटाच्या ट्रेलरची डेटही चाहत्यांना सांगून टाकलीये.
मुंबई : वरुण धवनचा (Varun Dhawan) बहुप्रतिक्षित आगामी ‘भेडिया’ चित्रपटाचे नुकताच टीझर रिलीज झालंय. टीझर पाहून चाहत्यांचे चित्रपटाविषयी आकर्षण अधिकच वाढले आहे. टीझरनंतर चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलीये. विशेष म्हणजे अगदी लवकरच चित्रपटाचे ट्रेलरही (Trailer) प्रदर्शित होणार आहे. इतकेच नाही तर ट्रेलरची रिलीज डेटही जाहिर करण्यात आलीये. यापूर्वी वरुण धवनने भेडियाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले होते. ‘स्त्री’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक (Amar Kaushik) हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यामुळे हा चित्रपट नक्कीच खतरनाक असणार आहे.
इथे पाहा भेडिया चित्रपटाचा टीझर
Banenge insaan mera naashta! ?#Bhediya trailer howling on 19th October, 2022! #BhediyaTrailerOn19thOct pic.twitter.com/OHUxSw30hC
— VarunDhawan (@Varun_dvn) September 30, 2022
वरुण धवनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भेडिया चित्रपटाचा टीझर रिलीज केलाय. यासोबतच वरुणने चित्रपटाच्या ट्रेलरची डेटही चाहत्यांना सांगून टाकलीये. 2022 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवनसोबत अभिनेत्री क्रिती सनॉन देखील मुख्य भूमिकेत आहे.
भेडिया चित्रपटाचे टीझर रिलीज करताना वरुण धवनने लिहिले की, ‘बनेगा इंसान उसका नाश्ता’…वरुण धवनने शेअर केलेले हे टीझर आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. टीझरच्या व्हिडीओमध्ये वरुण धवनचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय. भेडिया चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांच्या नजरा आहेत.
टीझरचा हा व्हिडीओ 45 सेकंदांच्या आहे. 45 सेकंदांमध्ये थरार अनुभवायला मिळतोय. या टीझरमध्ये जंगलात लांडग्याचे आवाज ऐकू येत आहेत. टीझरची सुरुवात जंगलाने होते. ‘खौफ है इस जंगल मे मेरे नाम का… असे देखील टीझरच्या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. भेडियाचा ट्रेलर 19 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.