Parineeti-Raghav | जोडीने परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा निघाले दिल्लीला, या दिवशी साखरपुड्याचा मुहूर्त?
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. अनेकदा हे दोघेसोबत स्पाॅट होताना दिसत आहेत. नुकताच यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.
मुंबई : आम आदमी पक्षाचा नेता आणि खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) आणि बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. मुंबईमध्ये यांना अनेकदा स्पाॅट केले गेले. इतकेच नाही तर यांच्या लग्नाच्या चर्चा देखील सुरू आहेत. याच महिन्यात यांचा साखरपुडा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून यांच्या लग्नाच्या (Marriage) चर्चा देखील जोर धरू लागल्या. राघव चड्ढा याच्याबद्दल परिणीती हिला प्रश्न विचारण्यात आला की, परिणीती लाजताना दिसते. इतकेच नाही तर परिणीती चोप्रा हिच्याबद्दल राघव याला विचारले की, तो देखील लाजतो. चाहते सतत यांना लग्न कधी करणारा हा प्रश्न विचारताना दिसत आहेत.
आम आदमी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देणारी एक पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टसोबत परिणीती आणि राघव यांचा एक फोटोही शेअर करण्यात आला होता. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा याच्या सुपारीचा कार्यक्रम देखील झाल्याचे सांगितले जात आहे.
नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा अजून एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव हे दिसत असून अत्यंत कुल लूकमध्ये परिणीती चोप्रा ही दिसत आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ विमानतळावरील आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे गाडीमधून उतरताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये परिणीती ही राघव याला काहीतरी बोलताना दिसत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी अंदाज बांधला आहे की, हे दोघे साखरपुड्यासाठीच दिल्लीकडे निघाले आहेत. रिपोर्टनुसार याच महिन्यात परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा पार पडणार असून अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत यांचा साखरपुडा होणार आहे. मात्र, अजूनही परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या नात्यावर काहीच भाष्य केले नाहीये.
सतत परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे सोबत स्पाॅट होत आहेत. मात्र, पापाराझी यांनी लग्न कधी आहे, हा प्रश्न विचारताच परिणीती आणि राघव यावर बोलणे टाळताना कायमच दिसतात. चाहते देखील परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच दिल्ली विमानतळावर राघव चढ्डा हा परिणीती चोप्रा हिला घेण्यासाठी पोहचला होता. याचेही काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.