Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kashmir Filesच्या यशानंतर विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; आता बनवणार The Delhi Files

'द काश्मीर फाईल्स'च्या (The Kashmir Files) मोठ्या यशानंतर आता दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. विवेक यांनी नुकतंच ट्विटरवर '#TheDelhiFiles' असा हॅशटॅग लिहिला आहे.

The Kashmir Filesच्या यशानंतर विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; आता बनवणार The Delhi Files
विवेक अग्निहोत्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 12:41 PM

‘द काश्मीर फाईल्स’च्या (The Kashmir Files) मोठ्या यशानंतर आता दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. विवेक यांनी नुकतंच ट्विटरवर ‘#TheDelhiFiles‘ असा हॅशटॅग लिहिला आहे. त्यामुळे ‘द दिल्ली फाईल्स’ हा त्यांचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय. विवेक अग्निहोत्री यांनी हे ट्विट करताच त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘तुमच्या या चित्रपटालाही यश मिळो’, असं एकाने लिहिलं. तर ‘सत्य समोर येण्याची आम्ही वाट पाहत आहोत’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं. ‘दिल्लीच्या अशा अनंत यातना आहेत, ज्या कव्हर करता येतील,’ असंही एकाने म्हटलंय. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातून मांडण्याचा दावा अग्निहोत्रींनी केला. त्यामुळे ‘द दिल्ली फाईल्स’मधून कोणती कथा ते मांडणार याबद्दलचं कुतूहल नेटकऱ्यांमध्ये निर्माण झालं आहे.

विवेक अग्निहोत्रींचं ट्विट-

‘द काश्मीर फाईल्स बनवण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व लोकांचे मी आभार मानतो. गेल्या चार वर्षांपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे मेहनत केली. लोकांना नरसंहार आणि काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय याची जाणीव करून देणं महत्त्वाचं होतं. आता नव्या चित्रपटावर काम करण्याची माझी वेळ झाली आहे’, असं ट्विट अग्निहोत्रींनी केलं.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलंच यश मिळालं. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने 250 कोटींचा गल्ला जमवला आहे. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासह इतरही नामांकित कलाकारांच्या भूमिका आहेत. काश्मिरी पंडितांचं दु:ख मांडणाऱ्या या चित्रपटावर विविध स्तरांतून प्रतिक्रियाही उमटल्या. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलं, तर काहींनी त्याविरोधात आपलं मत मांडलं.

हेही वाचा:

Ranbir Alia Wedding: ‘तुझा छोटा हात धरण्यापासून ते आता..’; रणबीर-आलियाच्या बॉडीगार्ड्सची पोस्ट चर्चेत

Ranbir Alia Wedding: लेकीच्या लग्नानंतर आई सोनी राजदान यांची भावूक पोस्ट; ‘ते म्हणतात की तुम्ही मुलीला..’

जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'.
औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल
औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल.
बीड हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कन्नापुरमध्ये खळबळ
बीड हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कन्नापुरमध्ये खळबळ.
कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्..
कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्...
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट.
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्...
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्....
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर...
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर....
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.