अनेकांनी कंटाळून मृत्यूलाही कवटाळले, विवेक अग्निहोत्री यांचा मोठा दावा, बाॅलिवूडमधील काळे सत्य…
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही तिच्या आगामी सिटाडेल सीजन 2 या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना प्रियांका चोप्रा ही दिसत आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय. ज्यामुळे ती चर्चेत आलीये.
मुंबई : बॉलिवूड ते हाॅलिवूड प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रियांका चोप्रा ही बाॅलिवूडच्या चित्रपटांपासून दूर आहे. तब्बल तीन वर्षांनंतर प्रियांका चोप्रा ही मुंबईत दाखल झाली होती. यावेळी तिने मुंबई मेरी जान म्हणत सोशल मीडियावर (Social media) काही फोटोही शेअर केले होते. प्रियांका चोप्रा हिच्या बाॅलिवूड चित्रपटाची चाहते वाट पाहात आहेत. मात्र, नुकताच प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूड चित्रपटांबद्दल (Bollywood movie) अत्यंत मोठा खुलासा केलाय. प्रियांका चोप्रा हिच्या या खुलाश्यानंतर चाहत्यांना अत्यंत मोठा धक्का बसलाय.
प्रियांका चोप्रा हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूड इंडस्ट्रीमधील काळे सत्य सांगितले आहे. बाॅलिवूडकडून हॉलिवूड चित्रपटांकडे जाण्याचे थेट कारणही प्रियांका चोप्रा हिने सांगितले. आता यावरून जोरदार चर्चा रंगताना दिसत आहेत. इतकेच नाहीतर आता यावर बाॅलिवूडमधील अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
प्रियांका चोप्रा म्हणाली की, इंडस्ट्रीमध्ये मला एका कोणात ढकलण्याचे काम सुरू होते. माझ्या भोवतालचे लोक मला चित्रपटांसाठी कास्ट करत नव्हते. मला बाॅलिवूड इंडस्ट्रीतील राजकारणाचा कंटाळा आला आणि त्यानंतर मला विश्रांतीची गरज होती. या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने थेट बाॅलिवूडमधील भेदभावावर भाष्य केले आहे. ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.
आता प्रियांका चोप्रा हिच्या या धक्कादायक खुलाश्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी मोठे भाष्य केले आहे. विवेक अग्निहोत्री म्हणाले की, जेव्हा मोठे दबंग लोक आपली गुंडगिरी दाखवतात, तेव्हा काही लोक आपले गुडघे टेकतात आणि नशा करायला लागतात, काही हार स्वीकारतात इतकेच नाहीतर काहीजण कंटाळून मृत्यूलाही कवटाळतात.
पुढे विवेक अग्निहोत्री म्हणाले, फार कमी लोक संघर्ष करून वेगळे स्थान निर्माण करतात आणि तेच खऱ्या आयुष्यातले स्टार आहेत. आता विवेक अग्निहोत्री यांची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. प्रियांका चोप्रा हिचा निशाणा नेमका कोणावर होता यावरून आता चर्चा रंगत आहे. अनेकांना वाटत आहे की, प्रियांका चोप्रा हिने करण जोहर याच्यावर निशाणा साधलाय. मात्र, या मुलाखतीमधून प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडमध्ये कशाप्रकारे भेदभाव केले जातात, यावर उघड उघडपणे भाष्य केले आहे.