The Kashmir Filesचा मोठा विजय; विवेक अग्निहोत्रींनी ट्विट करत दिली माहिती

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवलं. या चित्रपटाने आतापर्यंत 250 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. सिनेमागृह ते सोशल मीडियापर्यंत या चित्रपटाने चर्चा घडवून आणली.

The Kashmir Filesचा मोठा विजय; विवेक अग्निहोत्रींनी ट्विट करत दिली माहिती
Vivek agnihotri says big victory for The Kashmir Files Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 6:30 PM

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवलं. या चित्रपटाने आतापर्यंत 250 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. सिनेमागृह ते सोशल मीडियापर्यंत या चित्रपटाने चर्चा घडवून आणली. यावरून बॉलिवूड आणि नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले. आता हा चित्रपट संयुक्त अरब अमिरातीत (UAE) प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कटशिवाय तिथल्या सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे हा सर्वांत मोठा विजय असल्याचा आनंद अग्निहोत्रींनी ट्विट करत व्यक्त केला आहे. ‘इस्लामिक देशाने चार आठवड्यांच्या परीक्षणानंतर हा चित्रपट पास केला आहे आणि इथे काही भारतीय त्याला इस्लामोफोबिक म्हणत आहेत’, असं अग्निहोत्री म्हणाले.

द काश्मीर फाईल्स हा लवकरच सिंगापूरमध्येही प्रदर्शित होणार आहे. ‘मोठा विजय: अखेर UAE मध्ये सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाला. कोणत्याही कटशिवाय हा चित्रपट पास केला असून 15 वर्षांहून अधिक वय असलेले प्रेक्षक तो पाहू शकतात. येत्या 7 एप्रिल रोजी हा चित्रपट तिथे प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर सिंगापूरमध्येही तो प्रदर्शित होईल’, अशी माहिती अग्निहोत्रींनी ट्विटद्वारे दिली. “भारतात, काही लोक माझ्या चित्रपटाला इस्लामोफोबिक म्हणतायत, पण इस्लामिक देशानेच माझ्या चित्रपटाला कोणत्याही कटशिवाय पास केला आहे. भारतातील प्रेक्षकांची वयोमर्यादा तर 18 वर्षांवरील ठेवली आहे, पण तिथे 15 वर्षांवरील प्रेक्षक तो चित्रपट पाहू शकतात”, असं अग्निहोत्री म्हणाले.

विवेक अग्निहोत्रींचं ट्विट-

“हेच सिंगापूरमध्येही झालं. त्यांनीसुद्धा तीन आठवड्यांच्या परीक्षणानंतर हिरवा कंदील दाखवला. मुस्लिम ग्रुप्सचे अनेक प्रतिनिधी त्यात होते, मात्र तिथल्या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांनी हे स्पष्ट केलं की चित्रपटात आक्षेपार्ह असं काहीच नाही आणि प्रत्येकाने तो पहायला हवा. युएईमध्येही हेच घडलं. परीक्षण करताना अनेकांनी विविध मतं नोंदवली, मात्र त्या सर्वांचं म्हणणं हेच होतं की हा चित्रपट माणुसकीबद्दल भाष्य करतो, हा चित्रपट दहशतवादाच्या विरोधात भाष्य करतो, म्हणून ते सर्वजण पाहू शकतात. भारतात तर काहीजण हा चित्रपट न पाहताच त्याला विरोध करत आहेत”, अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांना उत्तर दिलं.

या चित्रपटात 1990 मध्ये दशतवाद्यांकडून झालेल्या नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा मांडण्यात आली आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी यांसह इतरही नामांकित कलाकारांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा:

RRR मधून फक्त आलियाच नव्हे तर मकरंद देशपांडे यांचेही सीन्स केले कट; राजामौलींच्या कामाबद्दल म्हणाले..

पतीच्या कॅन्सरविषयी बोलताना इन्स्टाग्राम LIVE दरम्यान अभिज्ञा झाली भावूक; म्हणाली..

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.