विवेक अग्निहोत्रींच्या The Kashmir Filesने पार केला 100 कोटींचा टप्पा; ‘दंगल’चाही विक्रम मोडला

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने अवघ्या आठ दिवसांत बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आठव्या दिवशी ब्लॉकबस्टर चित्रपटाने 19.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 116.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

विवेक अग्निहोत्रींच्या The Kashmir Filesने पार केला 100 कोटींचा टप्पा; 'दंगल'चाही विक्रम मोडला
The Kashmir FilesImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 1:47 PM

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने अवघ्या आठ दिवसांत बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आठव्या दिवशी ब्लॉकबस्टर चित्रपटाने 19.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 116.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याबद्दलची माहिती दिली. द काश्मीर फाईल्सच्या आठव्या दिवसाची कमाई ही आमिर खानच्या दंगल (Dangal) या चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईपेक्षा अधिक आहे. तर ‘बाहुबली 2’पेक्षा थोडी कमी आहे. ‘बाहुबली 2’ने आठव्या दिवशी 19.75 कोटी रुपये कमावले होते. तर दंगलने 18.59 कोटी रुपये कमावले होते. काश्मिरी पंडितांचं दु:ख मांडणारा हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यात 150 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज तरण आदर्शने वर्तवला आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या शुक्रवारी सर्वाधिक 19.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कमाईचा वाढता आकडा पाहता दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट कोणत्याही अडचणीशिवाय 150 कोटींचा टप्पा पार करू शकतो. शनिवार आणि रविवारसाठी अॅडव्हान्स बुकिंगसुद्धा चांगली झाली आहे. त्याचप्रमाणे हिंदीनंतर आता तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये हा चित्रपट डब करण्यात येणार आहे.

द काश्मीर फाईल्सची कमाई-

शुक्रवार- 3.55 कोटी रुपये शनिवार- 8.50 कोटी रुपये रविवार- 15.10 कोटी रुपये सोमवार- 15.05 कोटी रुपये मंगळवार- 18 कोटी रुपये बुधवार- 19.05 कोटी रुपये गुरुवार- 18.05 कोटी रुपये शुक्रवार- 19.15 कोटी रुपये एकूण- 116.45 कोटी रुपये

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर यांसह इतरही नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. प्रभासचा ‘राधेश्याम’ आणि आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ यांसारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांचाही त्यावर परिणाम झाला नाही. अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपटसुद्धा 18 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा:

पावनखिंडसाठी कौतुक तर द काश्मीर फाईल्ससाठी शिव्या; लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल चिन्मय मांडलेकरला काय वाटतंय?

‘ट्रकमध्ये सीटच्या मागे लपून पळालो होतो’; The Kashmir Files पाहून अभिनेत्रीने सांगितला मन हेलावणारा अनुभव

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.