Ranbir Alia: “मै थोडी ना कम हूँ”; रणबीरच्या अफेअर्सविषयी आलियाची रोखठोक प्रतिक्रिया

बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt). याच महिन्यात हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Ranbir Alia: मै थोडी ना कम हूँ; रणबीरच्या अफेअर्सविषयी आलियाची रोखठोक प्रतिक्रिया
Ranbir Kapoor, Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 12:24 PM

बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt). याच महिन्यात हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या लग्नाबाबत रणबीर किंवा आलियाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. गेल्या चार-पाच वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात जेव्हा या दोघांनी फोटोग्राफर्ससमोर एकत्र हजेरी लावली, तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. आलियाच्या आधी रणबीरचं नाव काही अभिनेत्रींसोबत सोडलं गेलं. यामध्ये सोनम कपूर, दीपिका पदुकोण (Deepika Padukone), कतरिना कैफ यांचा समावेश आहे. एका मुलाखतीत आलिया रणबीरच्या भूतकाळातील अफेअर्सविषयी व्यक्त झाली. 2019 मध्ये तिने ही मुलाखत दिली होती. यावेळी तिने रणबीरसोबतच्या लग्नाबद्दलही भाष्य केलं.

‘फिल्मफेअर’ला दिलेल्या या मुलाखतीत आलिया म्हणाली, “रणबीर हा अत्यंत साधा व्यक्ती आहे. त्याच्याशी जुळवून घेणं अजिबात कठीण नाही. तो माणूस म्हणून इतका चांगला आहे की कधी कधी मला वाटतं, मीसुद्धा त्याच्याइतकी चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न करावा. एक अभिनेता म्हणूनही तो उत्तम आहे. माझ्यापेक्षा कैकपटीने तो चांगला आहे. लग्नाबद्दल विचारत असाल तर सध्या मी त्या चर्चांमुळे खूप वैतागले आहे. रोज सकाळी उठून मला माझ्याच लग्नाविषयीच्या बातम्या ऐकायला, वाचायला मिळतायत. रणबीरला या गोष्टीची सवय झाली आहे.” रणबीरच्या भूतकाळाविषयी बोलताना ती पुढे म्हणाली, “त्याने काय फरक पडतो? एखाद्या व्यक्तीचा तो भूतकाळ आहे आणि त्याचा विचार मी इतका करत नाही. मी तरी कुठे कमी आहे!”

रणबीर-आलिया

रणबीर-आलियाने नुकतीच त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. 2018 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. तब्बल पाच वर्षांनी त्याचं शूटिंग संपलं. या चित्रपटाद्वारे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. येत्या 9 सप्टेंबर रोजी हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.