पत्नीच्या आरोपांवर हनी सिंहचं जाहीर उत्तर, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट, वाचा काय म्हणाला गायक…

बॉलिवूडचे प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंह (Yo Yo Honey Singh) याची पत्नी शालिनी तलवार हिने त्याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. ज्यावर हनी सिंहने आता आपले वक्तव्य सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहे.

पत्नीच्या आरोपांवर हनी सिंहचं जाहीर उत्तर, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट, वाचा काय म्हणाला गायक...
Honey Singh-wife
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 12:02 PM

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंह (Yo Yo Honey Singh) याची पत्नी शालिनी तलवार हिने त्याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. ज्यावर हनी सिंहने आता आपले वक्तव्य सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहे. हनी सिंहने आपल्या निवेदनात लिहिले आहे की, त्यांच्या पत्नी आणि शालिनी तलवार यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. हे संपूर्ण प्रकरण पाहून तो खूप दुःखी झाला. हे सर्व आरोप गंभीर आणि निंदनीय असल्याचे, त्याचे म्हणणे आहे.

या प्रेस नोटमध्ये, रॅपरने लिहिले की, “मी आजपूर्वी कधीही कोणतीही प्रेस नोट जारी केली नाही, कारण त्या वेळी सर्व चर्चा फक्त माझ्याबद्दल होती, अनेक वेळा माझ्याबद्दल चुकीचे मीडिया कव्हरेज झाले होते, माझ्या गाण्यांबद्दल बोलले जात होते. माझ्या आरोग्याबद्दलही बरेच काही सांगितले गेले, पण मी काहीच बोललो नाही. पण यावेळी माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या बहिणीबद्दल बोलले जात आहे, ज्यांनी माझ्या वाईट काळात मला साथ दिली. हे सर्व आरोप जे आमच्यावर लावण्यात आले आहेत, ते फक्त आम्हाला बदनाम करण्यासाठी करण्यात आले आहेत.”

पाहा पोस्ट :

हनी सिंहने या प्रेस नोटमध्ये पुढे लिहिले आहे की, “मी गेल्या 15 वर्षांपासून या मनोरंजन विश्वाशी संबंधित आहे, मी देशभरातील सर्व कलाकार आणि संगीतकारांसोबत काम केले आहे. माझ्या पत्नीशी असलेल्या माझ्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. एवढेच नाही तर, माझी पत्नी देखील गेल्या दशकभरापासून माझ्या क्रूचा एक भाग आहे. यासह, ती प्रत्येक कार्यक्रम, शूटिंग आणि मीटिंगमध्ये माझ्याबरोबर असते.”

चाहत्यांनी चुकीचा निष्कर्ष काढू नयेत!

हनी सिंहने पुढे लिहिली की, “मी हे सर्व आरोप चुकीचे समजतो, मी आता याबद्दल जास्त बोलणार नाही कारण हे प्रकरण आता न्यायालयात गेले आहे. या देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी सत्य बाहेर येण्याची पूर्णपणे वाट पाहत आहे. अशा वेळी, माझ्या सर्व चाहत्यांनी माझ्याबद्दल चुकीचे निष्कर्ष काढू नयेत, अशी माझी इच्छा आहे. मला खात्री आहे की मला न्याय मिळेल आणि सत्याचा विजय होईल. नेहमीप्रमाणे, मी माझ्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञ आहे ज्यांनी मला अधिक मेहनत आणि चांगले संगीत बनवण्यास प्रेरित केले.”

10 कोटींची भरपाई

गायक हनी सिंहने 23 जानेवारी 2011 रोजी शालिनी तलवारसोबत लग्न केले. शालिनी ही त्याची बालपणीची मैत्रीण असल्याचे म्हटले जाते. काही मीडिया रिपोर्ट्स असेही सांगत आहेत की, हनी सिंह मूल न झाल्याने डिप्रेशनमध्ये होते. या प्रकरणात शालिनीने हनी सिंहकडून 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. मात्र, आता हनी सिंहला कोर्टासमोर समोर आपली बाजू मांडायची आहे, त्याने या संपूर्ण प्रकरणामध्ये 28 ऑगस्टपूर्वी न्यायालयाला त्याचे उत्तर द्यायचे आहे.

(Yo yo Honey Singh answer to his wife’s allegations, post shared on social media)

हेही वाचा :

Rajeshwari Kharat : ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरातच्या घायाळ करणाऱ्या अदा, हे फोटो पाहाच

Top 5 News | टायगर श्रॉफच्या आवाजात ऐकायला मिळणार देशभक्तीपर गीत ते अभिनेत्री रेखा यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.