श्रीदेवी यांच्यामुळे दोन भावांमध्ये दुरावा; बोनी कपूर आणि अनिल कपूर यांच्यातील वाद टोकाला पोहोचला तेव्हा…

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या बोनी कपूर यांनी ओलांडल्या होत्या सर्व मर्यादा... बोनी आणि अनिल कपूर यांच्यातील वाद टोकाला पोहोचल्यानंतर मात्र...

श्रीदेवी यांच्यामुळे दोन भावांमध्ये दुरावा; बोनी कपूर आणि अनिल कपूर यांच्यातील वाद टोकाला पोहोचला तेव्हा...
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 10:41 AM

मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : श्रीदेवी यांनी असंख्य सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. श्रीदेवी यांचं अभिनय पाहून चाहत्यांनी देखील त्यांना डोक्यावर घेतलं. श्रीदेवी फक्त त्यांच्या अभिनयामुळेच नाही नृत्य कौशल्यामुळे देखील कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असायच्या. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक दिग्दर्शक आणि अभिनेत्यांची रांग लागलेली असताना, निर्माते बोनी कपूर आणि अभिनेते अनिल कपूर यांच्यामध्ये अभिनेत्रीमुळे वाद झाले. श्रीदेवी यांच्यामुळे दोन भावांमध्ये दुरावा आल्याच्या चर्चांनी देखील सर्वत्र जोर धरला..

दरम्यान, कपूर कुटुंब बॉलिवूडचं प्रसिद्ध कुटुंब असल्यांमुळे सदस्यांबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहत्यांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचलेली असायची. कुटुंबातील अनेक सदस्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बोनी कपूर आणि अनिल कपूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.

पण एक वेळ अशी अली जेव्हा दोघांमधील वाद टोकाला पोहोचला होता. बोनी कपूर यांनी अनिल कपूरसोबत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. यामध्ये मिस्टर इंडिया, जुदाई, नो एंट्री यांसारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे. पण मिस्टर इंडिया सिनेमाच्या शुटिंग दरम्यान बोनी आणि अनिल यांच्यातील वाद टोकाला पोहचले आहे. दोघांमधील वादाचं कारण होत्या श्रीदेवी…

विवाहित असताना देखील बोनी कपूर श्रीदेवी यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. आपल्या सिनेमा श्रीदेवी यांना कास्ट करण्यासाठी बोनी कपूर यांनी अनेकदा अभिनेत्रीला फोन केला. पण श्रीदेवी यांनी सिनेमासाठी नकार दिला. अशात पुन्हा सिनेमासाठी बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना विचारलं, तेव्हा अभिनेत्रीने निर्मात्याकडून तगडी रक्कम मागितली.

सिनेमासाठी श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याकडून १० लाख रुपये मानधन मागितलं. पण बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांनी ११ लाख रुपये दिले. अनिल आणि बोनी हे दोघे भाऊ मिळून हा सिनेमा तयार करत होते. दोघांनी देखील सिनेमात मोठी गुंतवणूक केली होती. त्यामुळे ११ लाख रुपये ही किंमत अनिल कपूर यांना फार मोठी वाटत होती.

पण श्रीदेवीच्या प्रेमात असलेल्या बोनी कपूरने त्यांनी कोणाचं काहीच ऐकलं नाही. पण ११ लाख रुपयांशिवाय बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांनी आणखी पैसे दिले. म्हणून अनिल कपूर प्रचंड चिडले आणि शुटिंगचा सेट सोडून निघून गेले. खरंतर त्यावेळी श्रीदेवी यांना आईच्या उपचारासाठी पैशांची गरज होती.

त्यामुळे बोनी कपूर यांनी कोणताही विचार न करता श्रीदेवी यांना मोठी रक्कम दिले. पण जेव्हा सेट सोडून गेलेल्या अनिल कपूर यांची समज दिग्दर्शक शेखर कपूर यांनी घाल्यानंतर अनिल कपूर यांनी सिनेमा करण्यास होकार दिला. पण बोनी कपूर यांच्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या. पण ‘मिस्टर इंडिया’ सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

श्रीदेवी यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या बोनी कपूर यांना स्वतःच्या वैवाहिक आयुष्याचं देखील भान राहिलं नव्हतं. बोनी कपूर यांचं पहिलं लग्न १९८३ मध्ये मोना कपूरशी झालं होतं. पण १९९६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन मुले आहेत. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनाही दोन मुली आहेत. खुशी आणि जान्हवी कपूर असं त्यांच्या दोन मुलींची नावे आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.