जान्हवी कपूर आणि वडिलांवर का आली इतके अपार्टमेंट्स विकण्याची वेळ? कोट्यवधींमध्ये होती किंमत!
boney kapoor and daughter : असं काय झालं की त्यांच्यावर एक दोन नाहीतर तब्बल चार घरे विकण्याची आली वेळ... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बोनी कपूर आणि जान्हवी कपूर यांची चर्चा...
मुंबई | 23 डिसेंबर 2023 : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर निर्माते बोनी कपूर यांनी त्यांच्या दोन मुलींचा सांभाळ करत आहे. श्रीदेवी यांच्या निधनांतर अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिची लहान बहीण खूशी कपूर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. जान्हवी आणि खुशी यांना देखील आई प्रमाणे बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करायचं आहे. याच दरम्यान, श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली आणि वडील तुफान चर्चेत आले आहेत. यामागे कारण देखील तसंच आहे. बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी मुंबईतील चार अपार्टमेंट्स विकेले आहेत. चारही अपार्टमेंट्स अंधेरी येथील ग्रीन एकर्स परिसरातील आहेत. सध्या सर्वत्र बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींची चर्चा होत आहे.
रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसंच आहे. बोनी यांनी त्यांचे अंधेरीतील 4 फ्लॅट्स आणि तेही मोठ्या रकमेत विकल्याची माहिती समोर येत आहे. बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी त्यांचे ४ अपार्टमेंट विकल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. हे चार फ्लॅट मुंबईतील अंधेरी येथील ग्रीन एकर्स परिसरात आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रिपोर्टमध्ये फ्लॅटची किंमतही नमूद करण्यात आली आहे. बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी सर्व फ्लॅट 12 कोटींहून अधिक रुपयांना विकल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात मोठा फ्लॅट 1870 स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेला होता. हा मोठा फ्लॅट अंजू नारायण आणि सिद्धार्थ नारायण यांना विकण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहेय.
जान्हवी कपूर हिचे आगामी सिनेमे
जान्हवी कपूर आणि अभिनेता वरुण धवन स्टारर ‘बवाल’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करु शकला नाही. पण अभिनेत्रीच्या अभिनयाचं कौतुक सर्वत्र करण्यात आलं. जान्हवी लवकरच ‘मिस्टर एन्ड मिसेज माही’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा रंगत आहे.
जान्हावी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील जान्हवी कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.