अनिल कपूर – श्रीदेवी स्टारर मिस्टर इंडिया सिनेमाचा दुसरा भाग लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीस
90 च्या दशकात चाहत्यांच्या मनावर राज्य करणार 'मिस्टर इंडिया' सिनेमाच्या रिमेकची मोठी घोषणा. मिस्टर इंडिया सिनेमाची जादू चाहत्यांना पुन्हा येणार अनुभवता.
मुंबई : ‘हवा हवाई…’ म्हणत सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांकडे आहेत. ‘मिस्टर इंडिया’ सिनेमात भन्नाट अभिनय करत श्रीदेवी यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं. मिस्टर इंडिया सिनेमात त्यांना साथ मिळाली अभिनेते अनिल कपूर यांची. ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील अनेक आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. निर्माते बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’ सिनेमाची निर्मिती केली होती. आता ‘मिस्टर इंडिया २’ बाबत देखील त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
एका मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले, ‘मी ‘मिस्टर इंडिया २’ सिनेमा साकारणार आहे. लवकरच सिनेमावर काम कारायला काहीही हरकत नाही.’ एवढंच नाही, तर बोनी कपूर ‘मिस्टर इंडिया २’ या सिनेमासोबतच ‘वान्टेड’ आणि ‘नो एन्ट्री’ सिनेमाच्या सिक्वलसाठी चाहते उत्सु्क असल्याचं देखील बोनी कपूर म्हणाले.
बोनी कपूर यांच्या या घोषणेमुळे येत्या काळत प्रेक्षकांना ‘वान्टेड’, ‘नो एंन्ट्री’ आणि ‘मिस्टर इंडिया’ सिनेमांचा सिक्वल मोठ्या पडद्यावर अनुभवता येईल असं म्हणायला हरकत नाही. सध्या बोनी कपूर यांच्या वक्तव्यामुळे चाहत्यांच्या मनात आनंदाचं वातावरण आहे. पुढे बोनी कपूर म्हणाले, ‘हम पांच देखील पुन्हा नव्याने यावा अशी चाहत्यांची इच्छा आहे.’
बोनी कपूर यांचं अभिनयात पदार्पण सिनेमांची निर्मिती करणारे बोनी कपूर आता अभिनयात पदार्पण करणार आहेत. ‘तू झूठी मैं मक्कार’ या सिनेमातून अभिनयाला सुरुवात करणार आहेत. ‘मी ही ऑफर नाकारणार होतो. पण लव रंजन यांनी मला सिनेमात काम करण्यासाठी मान्य केलं. एक खास अनुभव होता. मला आशा आहे की, प्रेक्षक सिनेमाला भरभरुन प्रेम देतील. ‘
‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्ध कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमा ८ मार्च रोजी सिनेमाघरात प्रदर्शित होणार आहे. सांगायचं झालं तर ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमात श्रद्ध आणि रणबीर पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे दोघांची रिल लाईफ जोडी चाहत्यांना आवडते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.