‘पठाण’ ने करून दाखवलं; सलग चौथ्या आठवड्यातही सिनेमा करतोय कोट्यवधींची कमाई

शाहरुख खान स्टारर 'पठाण' सिनेमाने मोडले सर्व रोकॉर्ड; 'बाहुबली 2' सिनेमालाही टाकलं मागे..., चौथ्या अठवड्यात देखील किंग खान याला पाहण्यासाठी सिनेमागृहात चाहत्यांची गर्दी

'पठाण' ने करून दाखवलं; सलग चौथ्या आठवड्यातही सिनेमा करतोय कोट्यवधींची कमाई
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 10:43 AM

Pathaan Box Office Day 28 : अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone) स्टारर ‘पठाण’ (pathan) सिनेमा २५ जानेवारीपासून रुपेरी पडद्यावर विक्रम रचत आहे. सिनेमाला एक महिना आता पूर्ण होईल, पण तरी देखील किंग खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची सिनेमागृहात गर्दी पाहायला मिळत आहे. आजही ‘पठाण’ सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. गेल्या २८ दिवसांपासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ सिनेमाने ५०० कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. सिनेमाचं यश पाहून किंग खान खरंच बॉक्स ऑफिसचा बादशाहा झाला आहे… असं म्हणायला हरकत नाही. (pathan full movie)

‘पठाण’ सिनेमाने फक्त हिंदी भाषेत ५०० कोटी रुपयांचा कमाई केली आहे. शिवाय येत्या दिवसांत या आकड्यामध्ये वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘पठाण’ सिनेमाने एस एस राजामौली यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘बाहुबली 2’ मागे टाकलं आहे. ‘बाहुबली 2’ सिनेमा ३४ दिवसांत ५०० कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. आता समोर येत असलेल्या आकड्यांनुसार शाहरुख याने अभिनेता प्रभास याला देखील मागे टाकलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘पठाण’ सिनेमा सलग चौथ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा कमाई करताना दिसत आहे. शाहरुख खान याच्या पठाण सिनेमावर अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर ‘शहजादा’ सिनेमाचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. ‘पठाण’ सिनेमाने २८ व्या दिवशी १ कोटी १० लाख रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. पठाण सिनेमाने ५०० कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. (shah rukh khan net worth)

तर जगभरात सिनेमाने १००० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ सिनेमात अभिनेता शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यामध्ये ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळाली. तर दुसरीकडे दीपिका पादुकोण हिने साकारलेल्या भूमिकेचं देखील सर्वत्र कौतुक झालं. तर ‘पठाण’ सिनेमात अभिनेता सलमान खान याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. (pathan box office collection)

View this post on Instagram

A post shared by Yash Raj Films (@yrf)

सांगायचं झालं तर, अभिनेता शाहरुख खान याने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण केल्यामुळे किंग खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, पण त्याचा कोणताही परिणाम बॉक्स ऑफिसवर झाला नाही. आता किती दिवस ‘पठाण’ सिनेमा रुपेरी पडद्यावर आपली जादू दाखवेल हे महत्त्वाचं ठरणार आहे. (pathaan movie photo)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.