AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 महिन्यांपासून बेपत्ता प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह सापडला लाकडी पेटीत, मानेवर जखमा आणि…

आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा... 4 महिन्यांपासून बेपत्ता प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह सापडला अशा अवस्थेत.. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या निधनाची चर्चा

4 महिन्यांपासून बेपत्ता प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह सापडला लाकडी पेटीत, मानेवर जखमा आणि...
| Updated on: May 27, 2023 | 12:40 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. नुकताच अभिनेते नितेश पांडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. शुक्रवारी देशातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि माजी मिस्टर इंडिया प्रेमराज अरोरा याचं निधन झाल्याची माहिती समोर आली. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर येत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. गेल्या ४ महिन्यांपासून गायब असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह लाकडाच्या पेटीत सापडला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त करत आहेत..

चार महिन्यांनंतर लाकडी पेटीत मृत अवस्थेत आढळलेला अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ब्राझिलियन अभिनेता जेफरसन मचाडो आहे. जेफरसन जवळपास चार महिन्यांपासून बेपत्ता होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. अशा स्थितीत जेफरसनचा मृतदेह सापडल्याने कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेला ब्राझीलचा अभिनेता जेफरसन मचाडो याचा मृतदेह रिओ दि जानेरो येथील एका घराबाहेर लाकडी पेटीत सापडला. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्याच्या निधनाची घोषणा सिंटिया हिल्सेंडेगर याने जेफरसन मचाडो याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या निधनाची चर्चा रंगत आहे..

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 44 वर्षीय जेफरसन मचाडोचा मृतदेह एका लाकडी पेटीत बांधून ठेवला होता. शिवाय लाकडी पेटी काँक्रीटने झाकलेली होती. सहा फूट खोल जमीनीत अभिनेत्याचा मृतदेह पुरण्यात आला होता. अभिनेत्याच्या निधनानंतर जेफरसन मचाडो याच्या वकिलांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे..

जेफरसन मचाडोचे कौटुंबिक वकील जयरो मॅगालहास यांनी सांगितले, “जेफरसनला घराच्या मागे दोन्ही हात मागे बांधून पुरण्यात आलं होतं. त्याच्या मानेवर जखाम होत्या…’ वकिलांच्या वक्तव्यानंतर याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.. शिवाय जेफरसन मचाडो याच्या निधनानंतर चाहत्यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे..

अभिनेत्याचे कुटुंबिय म्हणाले, ‘जेफरसनच्या हत्येमागे अशा लोकांचा हात आहे, ज्यांना अभिनेत्याच्या विरोधात होते. जेफरसन याचं यश लोकांना आवडत नव्हत.. याबाबत आणखी खुलासे लवकरच होतील… पूर्ण माहिती आम्ही पोलिसांना सांगणार आहोत, ज्यामुळे तपासात मदत होईल..’ सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या निधनाची चर्चा सुरु आहे..

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.