वयाच्या 29 व्या प्रसिद्ध सेलिब्रिटीने घेतला अखेरचा श्वास, निधनाचं कारण थक्क करणारं

एक दोन नाही तर चार वेळा 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीला का आला हृदयविकाराचा झटका? धक्कादायक कारण समोर... वयाच्या 29 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास... सेलिब्रिटीच्या निधनानंतर कुटुंबावर कोसळवा दुःखाचा डोंगर... चाहत्यांना देखील बसला मोठा धक्का

वयाच्या 29 व्या प्रसिद्ध सेलिब्रिटीने घेतला अखेरचा श्वास, निधनाचं कारण थक्क करणारं
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 9:07 AM

मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वयाच्या 29 व्या वर्षी एका प्रसिद्ध सेलिब्रिटीने अखेरचा श्वास घेतला आहे. सेलिब्रिटीच्या निधनामुळे चाहते आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध ब्राझिलियन मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर लुआना आंद्राडे हिचं निधन झालं आहे. लुआना हिच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एक कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करताना लुआना हिला हृदयविकाराच्या झटका आला आणि मॉडेलचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करताना लुआना हिला एक दोन वेळा नाही तर, तब्बल चार वेळा हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मॉडेलचं निधन झालं.

ब्राझिलियन टीव्ही शो ‘पॉवर कपल 6’ मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री लुआना साओ पाउलो येथील रहिवासी आहे. अभिनेत्रीवर एका हॉस्पिटलमध्ये लिपोसक्शन सर्जरी करण्यात आली होती. सर्जरी करताना अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, लिपोसक्शन ही एक कॉस्मेटिक सर्जरी आहे. सर्जरी दरम्यान लुआना हिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

सर्जरी दरम्यान अभिनेत्रीला चार वेळा हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉक्टरांनी तिला आयसीयूमध्ये दाखल केलं. पण लुआना हिचे प्राण डॉक्टरांना वाचवता आले नाहीत. अभिनेत्रीच्या निधनांमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा

प्रसिद्ध ब्राझिलियन मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर लुआना आंद्राडे हिच्या निधनाची माहिती समोर येताच चाहत्यांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला. लुआना हिच्या निधनावर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं. सध्या सर्वत्र लुआना आंद्राडे हिच्या निधनाची चर्चा सुरु आहे.

लुआना आंद्राडे हिच्या निधनानंतर बॉयफ्रेंड आणि टीव्ही अभिनेता Joao Hadad याने देखील भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियावर Joao Hadad पोस्ट करत म्हणाला, ‘मला फार दुःख झालं आहे. माझं स्वप्न अपूरं राहिलं. माझ्यातील एक हिस्सा गेला आहे. मोठ्या दुःखाने मी माझ्या लुआना हिला निरोप देत आहे…’ लुआना हिच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.