मोठ्या बहिणीने मोडलं 18 वर्षांचं लग्न, तर छोटी बहीण लग्नासाठी झाली चित्रपटांपासून दूर; यांना ओळखलंत का?

फोटोत दिसणाऱ्या या दोन चिमुकल्या मुलींना तुम्ही ओळखू शकता का? या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीत या दोन्ही बहिणी चर्चेत असतात. यापैकी एक तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. तर दुसऱ्या बहिणीने स्वत:ला इंडस्ट्रीपासून दूर केलं आहे.

मोठ्या बहिणीने मोडलं 18 वर्षांचं लग्न, तर छोटी बहीण लग्नासाठी झाली चित्रपटांपासून दूर; यांना ओळखलंत का?
'या' सुपरस्टार बहिणींना ओळखलंत का? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 8:18 AM

मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच बॉलिवूड सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. चाहतेसुद्धा अनेकदा आपल्या लाडक्या कलाकाराला ओळखण्याचं चॅलेंज स्वीकारतात आणि ते पूर्णसुद्धा करतात. अशातच आज आम्ही तुम्हाला अत्यंत रंजक आणि थोडंसं कठीण असं चॅलेंज देणार आहोत. हे आव्हान पूर्ण करताना तुम्हालासुद्धा नक्कीच मजा येईल. फोटोत दिसणाऱ्या या दोन चिमुकल्या मुलींना तुम्ही ओळखू शकता का? या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीत या दोन्ही बहिणी चर्चेत असतात. यापैकी एक तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. तर दुसऱ्या बहिणीने स्वत:ला इंडस्ट्रीपासून दूर केलं आहे.

शिलाई मशिनच्या खाली बसलेल्या या दोन चिमुकल्या बहिणींना ओळखणं इतकं सोपं नाही. या सख्ख्या बहिणी बॉलिवूडच्या अत्यंत सुंदर अभिनेत्रीसुद्धा आहेत. जर अजूनही तुम्ही त्यांना ओळखू शकला नाहीत, तर याचं उत्तर आहे बॉलिवूडची स्टायलिश दिवा मलायका अरोरा आणि तिची बहीण अमृता अरोरा. या पोस्टच्या दुसऱ्या फोटोमध्ये मलायकाने मोठ्या बहिणीप्रमाणे अमृताला घट्ट पकडल्याचं पहायला मिळत आहे. तर तिसरा फोटो पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. कारण या तिसऱ्या फोटोमध्ये दोघांची हेअर स्टाइल खूपच हास्यास्पद आहे. बॉलिवूडच्या या दोन सुपरकूल बहिणींना त्यांच्या लहानपणीच्या फोटोमध्ये सहज ओळखणं शक्य नाही.

हे सुद्धा वाचा

मलायका अरोराने जरी अभिनयात नशिब आजमावलं नसलं तरी डान्स, फिटनेस आणि फॅशनच्या बाबतीत ती आजही तरुण अभिनेत्रींना टक्कर देते. वयाची चाळिशी ओलांडलेल्या मलायकाचं फिटनेस पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. मलायकाने 18 वर्षांच्या संसारानंतर अरबाज खानला घटस्फोट दिला. सध्या ती तिच्या लव्ह-लाइफमुळे विशेष चर्चेत असते. अभिनेता अर्जुन कपूरला ती डेट करतेय. या दोघांच्या वयातील अंतरामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ती सोशल मीडियावर जाहीरपणे प्रेम व्यक्त करताना दिसते.

अमृता अरोराबद्दल बोलायचं झाल्यास, 2002 मध्ये ‘कितने दूर कितने पास’ या चित्रपटातून तिने अभिनयात पदार्पण केलं. मात्र काही वर्षांनंतर तिने अभिनयक्षेत्राला रामराम केला. अमृता आणि करिना कपूरची चांगली मैत्री असून या दोघी नेहमीच एकत्र पार्टी करताना दिसून येतात. अमृताने 2009 मध्ये व्यावसायिक शकील लडाकशी लग्न केलं. या दोघांना अझान आणि रायान अशी दोन मुलं आहेत.

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....