फोटोतील या चिमुकल्याला ओळखलंत का? 15 वर्षांनी लहान अभिनेत्रीशी केलं लग्न, गर्लफ्रेंडच्या घरासमोरून काढली वरात

सध्या शाहरुख खान हा बॉलिवूडचा रोमान्स किंग म्हणून ओळखला जातो. पण या दोघांमध्ये फरक फक्त इतकाच आहे की शाहरुखला रील आणि रिअल लाइफमध्ये खरं प्रेम मिळालं. मात्र फोटोतील हा सेलिब्रिटी खऱ्या आयुष्यातील प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी ठरला.

फोटोतील या चिमुकल्याला ओळखलंत का? 15 वर्षांनी लहान अभिनेत्रीशी केलं लग्न, गर्लफ्रेंडच्या घरासमोरून काढली वरात
या चिमुकल्याला ओळखलंत का?Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 7:30 PM

मुंबई : या फोटोतील चिमुकला हा मोठ्या पडद्यावरील सर्वांत पहिला सुपरस्टार आहे. या निरागस चेहऱ्याच्या मागे असा स्टार लपला आहे, ज्याच्या मागे पुढे दिग्दर्शकांची अक्षरश: रांग लागत होती. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असायचे. याच सेलिब्रिटीने मोठ्या पडद्यावर खऱ्या अर्थाने रोमान्सचा अर्थ सांगितला आणि रोमान्स किंगसुद्धा बनला. सध्या शाहरुख खान हा बॉलिवूडचा रोमान्स किंग म्हणून ओळखला जातो. पण या दोघांमध्ये फरक फक्त इतकाच आहे की शाहरुखला रील आणि रिअल लाइफमध्ये खरं प्रेम मिळालं. मात्र फोटोतील हा सेलिब्रिटी खऱ्या आयुष्यातील प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी ठरला. या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का?

फोटोतील हा चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून राजेश खन्ना आहेत. ज्यांना बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हटलं जातं. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक दमदार कलाकार होऊन गेले. देवानंद, दिलीप कुमार, सुनील दत्त यांचं नाव आणि इंडस्ट्रीतील काम सर्वांनाच माहीत आहे. मात्र जी प्रसिद्धी राजेश खन्ना ऊर्फ काका यांनी पाहिली, ती त्यांच्या आधी कोणत्याच स्टारला मिळाली नाही. आराधना या चित्रपटानंतर मुली अक्षरश: त्यांच्यासाठी वेड्या झाल्या होत्या. असं म्हटलं जातं की त्याकाळी तरुणी राजेश खन्ना यांचा फोटो सोबत घेऊन झोपायच्या. त्यांची गाडी घरातून एकदम स्वच्छ निघायची, पण परतताना त्यावर लिपस्टिकच्या असंख्य खुणा असायच्या. याच क्रेझमुळे दिग्दर्शकसुद्धा राजेश खन्ना यांना साईन करण्यासाठी रांग लावायचे. त्यांचा चित्रपट प्रदर्शित होताच हिट व्हायचा.

हे सुद्धा वाचा

राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडियाशी लग्न करून लाखो चाहतींचं मन मोडलं. असं म्हटलं जातं की राजेश खन्ना हे डिंपल यांच्यावर इतकं प्रेम करायचे की त्यांच्याशी लग्न करण्याशिवाय दुसरा कोणताच विचार त्यांच्या मनात नव्हता. 1973 मध्ये पहिल्याच चित्रपटानंतर डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना लग्नबंधनात अडकले. या दोघांना दोन मुली आहेत. लग्नानंतर डिंपलने चित्रपटात पुनरागमन करावं अशी राजेश खन्ना यांची अजिबात इच्छा नव्हती. यावरून नंतर दोघांमध्ये इतका वाद वाढला की राजेश खन्ना यांना सोडून डिंपल कपाडिया दोन मुलींसह माहेरी राहू लागल्या होत्या.

डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न करण्यापूर्वी राजेश खन्ना हे अंजू महेंद्रूसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्याही चर्चा होत्या. हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. यानंतर राजेश खन्ना यांनी त्यांची एक्स गर्लफ्रेंड अंजू महेंद्रूच्या घरासमोरून त्यांच्या लग्नाची वरात काढल्याच्याही बातम्या होत्या. बऱ्याच वर्षांनंतर अंजू महेंद्रू जेव्हा बिग बॉसच्या घरात आली तेव्हा तिनेसुद्धा काकांविषयी बरेच खुलासे केले होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.