AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या १३ व्या वर्षी ४३ वर्षीय पुरुषासोबत लग्न; मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिने घेतला मोठा निर्णय..

'या' प्रसिद्ध महिला सेलिब्रिटीवर आली आठ महिन्यांच्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ... वयाच्या १३ व्या वर्षी ४३ वर्षीय पुरुषासोबत लग्न केल्यामुळे तिच्या आयुष्यात आले अनेक संकटं...

वयाच्या १३ व्या वर्षी ४३ वर्षीय पुरुषासोबत लग्न; मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिने घेतला मोठा निर्णय..
| Updated on: Jul 04, 2023 | 10:04 AM
Share

मुंबई | बॉलिवूडमध्ये काम करत असताना अनेक सेलिब्रिटी एकत्र आले… त्यांच्यामध्ये मैत्री वाढली… मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर काही सेलिब्रिटींनी काही सेलिब्रिटींनी लग्न केलं, काहींचं ब्रेकअप झालं.. पण काही सेलिब्रिटींची फसवणूक झाली… तर बॉलिवूडच्या काही पुरुषांनी स्वतःच्या मुलांना नाव देण्यास नकार दिला. असंच काही झालं आहे.. बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांच्यासोबत… सरोज खान आता या जगात नसल्या तरी त्यांचा संघर्ष फार खडतर होता… एक प्रसिद्ध कोरिओग्राफ म्हणून त्यांनी अनेक गाण्यांना नवा आकार दिला. पण त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र अनेक चढ – उतार आले.

किशनचंद संधू आणि नोनी सिंग यांच्या घरात नागपाल यांचा जन्म झाला होता. ज्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्वीकार करत स्वतःचं नाव सरोज खान असं ठेवलं. वयाच्या १३ वर्षी सरोज खान ४३ वर्षीय नृत्य गुरू सोहनलाल यांच्यासोबत लग्न केलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९६३ साली सोहनलाल विवाहित असून ४ मुलांचे वडील आहेत… असं सरोज खान यांना कळालं…

असं असताना सोहनलाल यांनी स्वतःच्या मुलांना नाव देण्यास नकार दिला. त्यानंतर रोशन खान यांनी सरोज खान यांच्याकडे लग्नाची मागणी घातली आणि मुलांना स्वतःचं नाव देईल असं वचन कोरियोग्राफरला दिला. अशात सरोज खान यांनी दुसरं लग्न रोशन खान यांच्यासबोत केलं. दुसऱ्या लग्नानंतर सरोज खान यांच्या मुलांना खान नाव मिळालं. रोशन खान यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं.

पण सरोज खान यांच्या आयुष्यात अनेक चढ – उतार आहे. सरोज खान यांनी ८ महिन्यांच्या मुलीला गमावलं.. ८ महिन्यांच्या मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर सरोज खान थेट कामासाठी सेटवर पोहोचल्या. मुलीच्या निधनानंतर सरोज खान ‘हरे राम हरे कृष्णा’ सिनेमातील ‘दम मरो दम’ गाणं कोरियोग्राफ करण्यासाठी निघाल्या…

सरोज खान यांच्या आयुष्यात आलेले चढ – उतार….

केवळ वयाच्या तिसऱ्या वर्षी सरोज खान यांनी करियरला सुरुवात केली होती. १९५१ साली प्रदर्शित झालेल्या ‘नजराना’ सिनेमात सरोज खान यांनी अभिनेत्री श्यामा यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. सरोज खान यांनी बॅकग्राउंड डान्सर म्हणून देखील काम केलं. पण ‘दिल ही तो है’ सिनेमातील ‘निगाह मिलाने को जी चाहता है’ गाण्याची कोरियोग्राफी केली आणि बॉलिवूडमध्ये बेस्ट कोरियोग्राफर पुरुस्काराचा काळ सुरु झाला. बेस्ट कोरियोग्राफ म्हणून सजोर खान यांना पहिला पुरस्कार मिळाला होता…

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.