Celebrities corona update: हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खान आणि कॉमेडियन वीरदास कोरोना पॉझिटिव्ह, सेलिब्रिटी कोरोनाच्या गर्तेत
हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खानला कोरोनाची लागण झाली आहे. तसंच कॉमेडियन वीरदासलाही कोरोनाने गाठलंय. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्याने सोशल मीडियाच्या माध्यामातून सांगितलं आहे.
![Celebrities corona update: हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खान आणि कॉमेडियन वीरदास कोरोना पॉझिटिव्ह, सेलिब्रिटी कोरोनाच्या गर्तेत Celebrities corona update: हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खान आणि कॉमेडियन वीरदास कोरोना पॉझिटिव्ह, सेलिब्रिटी कोरोनाच्या गर्तेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/01/11173248/sara-ali-khan-1-1.jpg?w=1280)
Celibrities corona update: कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसतेय. अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खानला कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत तिने याबाबतची माहिती दिली आहे.
View this post on Instagram
कॉमेडियन वीरदासलाही कोरोनाने गाठलंय. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्याने सोशल मीडियाच्या माध्यामातून सांगितलं आहे. आपल्या तब्येतीविषयी बोलताना वीरदासने इन्स्टाग्रामवर म्हटलंय, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीये. कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. मी घरातच क्वॉरंटाईन आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. काळजी करू नका… पण काळजी घ्या, असं वीरदासने म्हटलंय.
View this post on Instagram
कलाकारांच्या भोवती कोरोनाचा विळखा
कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढते आहे. दाक्षिनात्य अभिनेता महेश बाबू, मधुर भंडारकर, स्वरा भास्कर, विशाल डडलानी, प्रतीक बब्बर या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसंच गायक अरिजीत सिंह, नफीसा अली सोढी आणि मानवी गगरू हे कलाकारदेखील कोरोनाच्या विळख्यात अडकलेत.
सेलिब्रिटींभोवती कोरोनाचं संकट अधिक गहिरं होताना दिसतंय. ‘जन्नत २’ फेम अभिनेत्री ईशा गुप्ताचाही ( isha gupta) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. ईशाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन याची माहिती दिली आहे. कोरोनासंबंधीची सगळी काळजी घेऊनही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाईन आहे. घरी राहूनच मी उपचार घेतेय. तुम्ही सगळ्यांनी कोरोनाची काळजी घ्या, असं ईशाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
संबंधित बातम्या-