Poonam Pandey Death : किती भयानक आहे सर्वाइकल कॅन्सर, ज्यामुळे पूनम पांडे हिने गमावले प्राण
Poonam Pandey Death News : प्रचंड भयानक आहे सर्वाइकल कॅन्सर, ज्यामुळे झालं पूनम पांडे हिचं निधन, कॅन्सरमुळे दरवर्षी 74 हजार महिला गमावतात स्वतःचे प्राण... 9 ते 14 वयोगटातील मुलींनी घ्यावी अशी काळजी...
Poonam Pandey Death News : झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचं निधन झालं आहे. सर्वाइकल कॅन्सरमुळे अभिनेत्रीने स्वतःचे प्राण गमावले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या कॅन्सरमुळे पूनम हिचं निधन झालं, त्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत 2024-2025 चा केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती की, सरकार सर्वाइकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींना निशुल्क लसीकरण करण्याचा मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे सर्वाइकल कॅन्सर या भयानक आजारापासून महिलांचं रक्षण करता येईल. तर आज जाणून घेऊ सर्वाइकल कॅन्सर किती धोकादायक आहे.
सर्वाइकल कॅन्सरचा महिलांना अधिक धोका
भारतातील महिलांमध्ये दुसरा सर्वात धोकादायक कॅन्सर म्हणजे सर्वाइकल कॅन्सर… सर्वाइकल कॅन्सरमुळे दरवर्षी हजारो महिलांना आपला जीव गमवावा लागतो. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरचा भारताबाबतचा अहवाल सांगतो की, भारतात दरवर्षी सुमारे 1 लाख 30 हजार महिलांना सर्वाइकल कॅन्सर असल्याचं निदान होतं.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, यामध्ये दरवर्षी सुमारे 74 हजार महिलांना आपला जीव गमवावा लागतो. अशा परिस्थितीत, स्तनाच्या कर्करोगानंतर हा दुसरा सर्वात जास्त प्रभावित होणारा कर्करोग आहे आणि भारतातील सर्वाधिक मृत्यू दर असलेला पहिला कर्करोग आहे. भारतात ही संख्या फार मोठी आहे.
काय असतं सर्वाइकल कॅन्सर?
सर्वाइकल कॅन्सर प्रामुख्याने हाई रिस्क ह्यूमन पैपिलोमा व्हायरल समूह गटाच्या संसर्गामुळे होतो. शारीरिक संबंधांनंतर एकमेकांना प्रसारित होतो. याची लक्षणं देखील गंभीर असतात. सुरुवातील सर्वाइकल कॅन्सरची लक्षणं दिसून येत नाहीत. याच कारणामुळे अनेक वर्षांनंतर देखील सर्वाइकल कॅन्सरचं निदान होत नाही. भारतात, विशेषत: स्त्रियांमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर सर्वाइकल कॅन्सरचं निदान होतं. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि बहुतांश महिलांना आपला जीव गमवावा लागतो.
सर्वाइकल कॅन्सरपासून कसे वाचवाल स्वतःचे प्राण?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सर होण्याआधी आपण स्वतःचे प्राण वाचवू शकतो. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी. याला प्रतिबंध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लस, जी लहान मुली आणि मुलांना संसर्गाच्या टप्प्यापूर्वी दिली जावी.
सीरम इन्स्टिट्यूटची सर्वाइकल कॅन्सरसाठी भारतात बनवलेली Cervavac लस 98 टक्के प्रभावी आहे, परंतु यासाठी शारीरिक संभोग किंवा शारीरिक संबंधापूर्वी ती दिली जाणे अत्यंत आवश्यक आहे. 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना लसीकरण करणे योग्य आहे, परंतु त्यानंतर ही लस दिली जाऊ शकत नाही असे नाही.