मुंबईतील या शाळेत शिकतात बॉलिवूड कलाकारांची मुले, इतकी आहे फी
नुकताच शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनात बॉलिवूड सेलिब्रिटींचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन, करण जोहर, शाहरुख खान डान्स करताना दिसत आहेत. मुंबईतील कोणत्या शाळेत सेलिब्रिटींची मुले शिकतात. काय आहेत या शाळेत सुविधा. किती आहे फी जाणून घ्या.
मुंबई : बॉलिवूडचे सेलब्रिटी नेहमीच चर्चेत असतात. पण त्यांची मुले देखील चर्चेत राहतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सूक असतात. बॉलिवूड सेलिब्रिटींची मुले कुठे शिकतात असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींची मुले शिकतात. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल (DAIS) ची स्थापना 2003 मध्ये नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली झाली. अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींची मुले या शाळेत शिकतात.
मुकेश अंबानी यांचा मुलगा आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी 2009 मध्ये धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आयबी डिप्लोमा प्रोग्राम पूर्ण केला. ही शाळा शैक्षणिक क्षेत्रात सतत नवीन मानके प्रस्थापित करत आहे आणि अवघ्या 20 वर्षांत जगातील सर्वोत्कृष्ट शाळांच्या लीगमध्ये पोहोचली आहे.
शाळेची फी किती आहे?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एलकेजी ते सातवीपर्यंतची वार्षिक फी 1 लाख 70 हजार रुपये आहे. म्हणजेच महिन्याला 14,000 रुपये. इयत्ता 8 वी ते 10 वी साठी ICSE ची वार्षिक फी 1,85,000 रुपये आहे. इयत्ता 8 ते 10 साठी IGCSE साठी वार्षिक शुल्क 5.9 लाख रुपये आहे. IBDP बोर्डाची इयत्ता 11 आणि 12 वी साठी वार्षिक फी 9.65 लाख रुपये आहे.
शाळेत काय आहेत सुविधा?
ही शाळा पूर्णपणे डिजीटल आहे. शाळेत एकूण 60 वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात डिस्प्ले आणि राइटिंग बोर्ड, इंटरनेट कनेक्शन, कस्टम मेड फर्निचर, मल्टीमीडिया सपोर्ट आणि एसी आहेत. खेळाकडेही शाळेत विशेष लक्ष दिले जाते. शाळेमध्ये टेनिस आणि बास्केटबॉल कोर्ट तसेच मैदानी खेळांसाठी अनेक पर्याय आहेत. खेळाचे मैदान २.३ एकरात पसरलेले आहे. आर्ट रूम, लर्निंग सेंटर, योगा रूम, सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, मल्टीमीडिया ऑडिटोरियम देखील आहे.