मुलाच्या नावावरून ट्रोलिंगनंतर चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय, “यापुढे कधीच महाराजांची..”

मुलाचं नाव 'जहांगीर' ठेवल्यामुळे अभिनेता चिन्मय मांडलेकरला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगनंतर त्याने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचं त्याने म्हटलंय.

मुलाच्या नावावरून ट्रोलिंगनंतर चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय, यापुढे कधीच महाराजांची..
Chinmay MandlekarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 3:10 PM

अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर यांना गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या नावावरून प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय. पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज साकारतात पण खऱ्या आयुष्यात मात्र मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवलंय, असं म्हणत नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. या टीकेनंतर नेहाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत मुलाचं नाव ‘जहांगीर’ का ठेवलं, त्याचा नेमका अर्थ काय हे सांगत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यानंतर काही तासांनी चिन्मयने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत मोठा निर्णय जाहीर केला. “जर पडद्यावर मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्याने माझ्या कुटुंबीयांना, मुलाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत असेल तर मी यापुढे ही भूमिका साकारणार नाही,” असं त्याने म्हटलंय. त्याच्या या व्हिडीओवर सर्वसामान्यांपासून चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

काय म्हणाला चिन्मय?

“माझ्या पत्नीने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतरसुद्धा कमेंट्स कमी झाल्या नाहीत. त्या आधीपेक्षा अधिक वाढल्या आहेत आणि आता लोक त्या मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यांवर शंका घेऊ लागलेत. एक व्यक्ती म्हणून मला याचा खूप त्रास होतोय. माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता. पण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोण्याचा हक्क तुम्हाला आहे, असं मला वाटत नाही. मी आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का, असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे. माझ्या मुलाचा जन्म 2013 मध्ये झाला आणि आज तो 11 वर्षांचा आहे. हे ट्रोलिंग तेव्हा नाही झालं, ते आता होतंय. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनं आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या, देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही, तर अमराठी लोकांचंसुद्धा प्रेम मिळालं. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल, तर मी अत्यंत नम्रपूर्वक हे सांगू इच्छितो की यापुढे मी याही भूमिका साकारणार नाही. कारण मी करत असलेलं काम, मी करत असलेली भूमिका यांचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल, तर एक वडील म्हणून, नवरा म्हणून आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं जास्त महत्त्वाचं आहे”, असं तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

“माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे हे खटकतंय, मग जहांगीर आर्ट गॅलरीचं नाव बदलणार आहात का? जहांगीर नावाच्याच माणसाला आपल्या देशानं भारतरत्न पुरस्कार दिला. भारतरत्न जहांगीर रतनची दादाभाई टाटा- जेआरडी टाटा. त्यानी उभ्या केलेल्या एअर इंडिया या कंपनीच्या विमानातून आपण अभिमानानं प्रवास करतो. त्यांनी उभ्या केलेल्या अनेक उद्योगांचा फायदा भारतातील प्रत्येक नागरिकाला होतोय. त्यांचा वापर करताना आपण हा विचार करतो का? टायटनच्या घडाळ्यांपासून जे लोक त्यांच्याकडे काम करतात, त्यांच्याबाबत आपण विचार नाही करत की, यांच्या प्रणेत्याचं नाव जहांगीर होतं”, अशा शब्दांत चिन्मयने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.

“अभिनेते हे नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात. अनेकांनी त्या ट्रोलिंगमध्ये असंही म्हटलंय की तुम्ही एका विशिष्ट राजकीय विचारसरणीला खतपाणी घातलं, मग आता तुमच्यासोबत हे होणारच. माझं हे आव्हान आहे की मला दाखवून द्या की मी आजपर्यंत कुठल्या राजकीय पक्षाचा प्रचार केला. असं कधीच झालं नाही. माझी राजकीय विचारसरणी स्वतंत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनं मला आतापर्यंत खूप प्रेम दिलं. पण जर त्यांच्या भूमिकेमुळे माझ्या कुटुंबाला आणि माझ्या 11 वर्षांच्या मुलाला या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल, तर त्यांची माफी मागून मी हे जाहीर करू इच्छितो की यापुढे मी महाराजांची भूमिका साकारणार नाही”, असं त्याने या व्हिडीओअखेर स्पष्ट केलंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.