शुबमन गिल – सारा तेंडुलकर यांच्या नात्याचं रहस्य अखरे समोर, ‘या’ क्रिकेटरकडून मोठा खुलासा
Shubman Gill - Sara Tendulkar : शुबमन गिल - सारा तेंडुलकर खरंच करत आहेत एकमेकांना डेट? 'या' क्रिकेटरने दिलेलं उत्तर जाणून तुम्हालाही बसेल मोठा धक्का..., जुना व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील कळेल सत्य
मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : भारताचा लोकप्रिय क्रिकेटपटू शुबमन गिल कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून शुबमन यांचं नाव सारा तेंडुलकर आणि अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. पण सारा अली खान हिने ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं. लोकं चुकीच्या सारावर निशाणा साधत आहेत.. असं सारा अली खान म्हणाली होती. वर्ल्डकप दरम्यान सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगत आहेत. एवढंच नाही तर अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.
दरम्यान, क्रिकेटपटू चिराग सूरी याचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये चिराग सूरी सारा आणि शुबमन यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसत आहे. चिराग सूरी याला ‘शुबमन गिल याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारण्यात आलं..’ तेव्हा चिराग सूरी म्हणाला, ‘शुबमन याची एक गर्लफ्रेंड आहे आणि तिचं नाव सारा आहे.. सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा…’
View this post on Instagram
सध्या चिराग सूरी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुलाखतीनंतर शुबमन याने चिराग सूरी याला सोशल मीडियावरुन अनफॉलो केलं.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. पण दोघांना देखील त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
काही दिवसांपूर्वी शुबमन याने देखील एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता. मुलाखतीत शुबमन याला आवडत्या अभिनेत्रीबद्दल विचारलं होतं. तेव्हा क्रिकेटरने सारा अली खान हिचं नाव घेतलं होतं. एवढंच नाही तर, रिेलेशनशिपबद्दल देखील क्रिकेटरने मोठा खुलासा केला होता.
अशात सारा आणि शुबमन कधी त्यांच्या नात्याबद्दल मौन सोडतात… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोशल मीडियावर देखील सारा आणि शुबमन यांचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. चाहत्यांमध्ये देखील सारा आणि शुबमन यांच्या नात्याची चर्चा रंगलेली असते. अशात सारा आणि शुबमन कधी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.