रामचरणसोबत खास कनेक्शन असलेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट? 3 वर्षांपूर्वीच झालं होतं लग्न

निहारिकाने 'ओका मनसू' आणि 'हॅपी वेडिंग' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच ती निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. तर चैतन्यने बिट्स पिलानी आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून शिक्षण पूर्ण केलं.

रामचरणसोबत खास कनेक्शन असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट? 3 वर्षांपूर्वीच झालं होतं लग्न
रामचरणImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 1:14 PM

हैदराबाद : बॉलिवूड असो किंवा साऊथ फिल्म इंडस्ट्री.. गेल्या काही वर्षांत बऱ्याच सेलिब्रिटी कपल्सच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या. समंथा रुथ प्रभूपासून ते धनुषपर्यंत, साऊथच्या लोकप्रिय सेलिब्रिटींच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का दिला. त्यातच आता आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या घटस्फोटाची चर्चा आहे. ही अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठ्या कुटुंबाची सदस्य आहे. मेगास्टार चिरंजीवी यांची पुतणी आणि RRR फेम अभिनेता रामचरण याची चुलत बहीण निहारिका कोनिडेलाच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. या चर्चांमागचं कारण म्हणजे निहारिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती चैतन्यला अनफॉलो केलं आहे. तर चैतन्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून निहारिकासोबतचे आणि लग्नाचे फोटो डिलिट केले आहेत.

2020 मध्ये राजस्थानमधील उदयपूरमध्ये निहारिका आणि चैतन्यचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते. मात्र आता लग्नाच्या तीन वर्षांतच या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. याबाबत अद्याप निहारिका किंवा चैतन्यकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आली नाही.

हे सुद्धा वाचा

निहारिकाचे वडील नागेंद्र बाबू हे साऊथचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. तर मेगास्टार चिरंजीवी यांची ती पुतणी आहे. तिच्या लग्नाला चिरंजीवी, अल्लू-अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा, रामचरण आणि त्याची पत्नी उपासना, साई धरम तेजा आणि सर्जा कल्याण यांसारख्या कलाकारांनी हजेरी लावली होती.

निहारिकाने ‘ओका मनसू’ आणि ‘हॅपी वेडिंग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच ती निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. तर चैतन्यने बिट्स पिलानी आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून शिक्षण पूर्ण केलं. हैदराबादमधील एका मल्टी नॅशनल कंपनीत तो बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम करतोय.

लग्नानंतर निहारिका आणि चैतन्य हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहू लागले. मात्र या दोघांमध्ये काहीच आलबेल नसल्याने लवकरच घटस्फोटाचा निर्णय घेणार असल्याचं कळतंय. 2022 मध्ये या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा होती. मात्र त्यावेळी दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत चर्चांना पूर्णविराम दिला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.