AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivaji Satam यांची डोळ्यात पाणी आणणरी ‘लव्हस्टोरी’, पत्नीने साथ सोडली पण ACP Pradyuman यांनी…

पत्नीने साथ सोडल्यानंतर 'या' व्यक्तींनी दिला अभिनेते शिवाजी साटम यांना आधार, २४ वर्षांच्या सुखी संसारानंतर... 'सीआयडी' फेम शिवाजी साटम यांची लव्हस्टोरी...

Shivaji Satam यांची डोळ्यात पाणी आणणरी 'लव्हस्टोरी', पत्नीने साथ सोडली पण ACP Pradyuman यांनी...
| Updated on: Apr 21, 2023 | 10:49 AM
Share

मुंबई : ‘दया… कुछ तो गडबड हैं..’, असं म्हणत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते शिवाजी साटम यांचा वाढदिवस आहे. शिवाजी साटम यांनी अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. पण ‘सीआयडी’ या मालिकेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर शिवाजी साटम यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. शिवाजी साटम कायम त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. पण त्यांचं खासगी आयुष्य देखील कायम चर्चेत राहिलं. शिवजी साटम आज ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज आपण त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेवू. शिवाजी साटम यांची लव्हस्टोरी डोळ्यात पाणी आणणारी आहे. शिवाजी साटम आणि अरुणा साटम यांचं अरेंज मॅरेज होतं, पण दोघांना पाहिल्यानंतर असं वाटत नव्हतं की, त्यांचे अरेंज मॅरेज आहे. शिवाजी साटम यांच्या वडिलांच्या इच्छेने शिवाजी साटम आणि अरुणा साटम यांचं लग्न झालं.

शिवाजी साटम यांचे वडील जिमनॅस्ट होते. शिवाय ते कुस्ती देखील खेळायचे. त्यांची बहीण ऍथलिट होती. तर शिवाजी साटम यांच्या पत्नी महाराष्ट्र कब्बडी टीमच्या कॅप्टन होत्या. त्यांना छत्रपती शिवाजी पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं. पण शिवाजी साटम आणि अरुणा साटम फक्त २४ वर्ष सुखी संसार करू शकले.

खुद्द शिवाजी साटम यांनी पत्नीच्या निधनानंतर आलेल्या परिस्थितीबद्दल सांगितलं आहे. अरुणा साटम यांचं कर्करोगाने निधन झालं. त्यांच्यावर तब्बल सात वर्ष उपचार सुरु होते. शिवाजी साटम म्हणाले, ‘कठीण परिस्थिती आल्यानंतर आपल्यामध्ये नकळत हिंमत येते. ती वेळ अत्यंत कठीण होती. मुलं मोठी होत होती.. त्यांच्यावर उत्तम संस्कार देखील करायचे होते.’

शिवाजी साटम पुढे म्हणाले, ‘मी ‘गुलाम-ए-मुस्तफा’ सिनेमाचं शुटिंग करत होतो, तेव्हा माझ्या पत्नीचं निधन झालं. अशा परिस्थितीत अभिनेते नाना पाटेकर, अरूणा इराणी यांनी माझी साथ दिली. ते माझं कुटुंब नव्हते, पण कुटुंबापेक्षा कमी देखील नव्हते… तीन महिने त्यांनी मला सांभाळून घेतलं…’ असं देखील शिवाजी साटम म्हणाले. पत्नीच्या निधनानंतर शिवाजी साटम यांनी दुसरं लग्न केलं नाही. आजही ते पत्नीच्या आठवणीत जगत आहेत.

शिवाजी साटम यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘नायक’, ‘वास्तव’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘चायना गेट’, ‘यशवंत’, ‘जिस देश में गंगा रेहता हैं’ ‘सूर्यवंशम’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. १९९८ साली शिवाजी साटम यांनी ‘सीआयडी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. एवढंच नाही तर, शिवाजी साटम यांनी अनेक सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केलं आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.