CID मध्ये मृतदेहांची तपासणी करणारी डॉक्टर तारिका सावरते अनेकांचं भविष्य; नक्की काय करते अभिनेत्री?
झगमगत्या विश्वापासून दूर असलेली CID फेम डॉक्टर तारिका आता सावरते अनेकांचं भविष्य... अभिनेत्री करत असलेल्या कामाची सर्वत्र चर्चा... नक्की कायम करते 'ती'?
मुंबई : ‘कुछ तो बात है दया…’ हा डायलॉग आज प्रत्येकाला माहिती आहे. CID मालिकेनं प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. आजही सीआयडी म्हटलं अनेक जुन्या आठवणी ताज्या होतात. एखादी हत्या झाल्यानंतर सीआयडीला आलेला फोन, त्यानंतर सुरु झालेली तपासणी आणि मृतदेहांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना आजही प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत. सीआयडीमध्ये मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या कलाकारांच्या चर्चा आजही सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. सध्या चर्चा रंगत आहे सीआयडीमध्ये डॉक्टरची भूमिका साकारणाऱ्या डॉक्टर तारिका हिची… झगमगत्या विश्वापासून दूर असलेली डॉक्टर तारिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सीआयडीनंतर गायब झालेली तारिका सध्या काय करते? ती कशी दिसते? अशा अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
सीआयडीमधील अधिकारी घटनेची कसून तपासणी करायचे, पण डॉक्टर तारिका हिने दिलेल्या क्लूनंतर सीआयडीच्या तपासात मोठी मदत व्हायची. उंच उंची, कुरळे केस आणि डस्की स्किन असलेल्या तारिकाला पाहून ती खरंच एक फॉरेन्सिक तज्ञ आहे. यावर लोकांचा विश्वास बसू लागला होता. सीआयडी शो संपून अनेक वर्ष लोटली आहेत. शोची फॉरेन्सिक डॉ. तारिका म्हणजेच श्रद्धा मुसळे सध्या तुफान चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
सीआयडीमध्ये घटनेचा तपास लावणारी तारिका म्हणजे श्रद्धा मुसळे आता अनेकांचं भविष्य सावरत आहे. श्रद्धा मुसळे हिच्या लोकप्रियतेत फक्त आणि फक्त सीआयडीमुळे वाढ झाली. सीआयडी शिवाय अभिनेत्री अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये देखील दिसली, पण श्रद्धाला यश मिळालं नाही. आता सीआयडीने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी कलाकारांची मैत्री आजही तशीच आहे..
View this post on Instagram
नुकताच श्रद्धा हिने सोशल मीडियावर सीआयडीच्या टीमसोबत फोटो शेअर केला होता. ज्यामुळे काही कलाकार दिसत नव्हते. श्रद्याची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. फोटोवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला.
श्रद्धा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, श्रद्धा आता आनंदी आयुष्य जगत आहे. श्रद्धा झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर श्रद्धाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. रुपेरी पडद्यावर सक्रिय नसल्यामुळे अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.