Kangana Ranaut | कॉंग्रेसच्या खासदाराने कंगनाला डिवचले, म्हटले हिमाचलचा सडलेला सफरचंद
मुंबई : बॉलिवूड कलाकारांमध्ये सध्या चर्चेत असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन गाजत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये अभिनेत्री कंगना रनौतने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला विरोध करणारे एक ट्विट केले होते.
मुंबई : बॉलिवूड कलाकारांमध्ये सध्या चर्चेत असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन गाजत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये अभिनेत्री कंगना रनौतने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला विरोध करणारे एक ट्विट केले होते. त्यावरून कंगनाला ट्रोल करण्यात आले. तिच्यावर टीकाही करण्यात आली होती. अशा परिस्थितीत आता पंजाबच्या लुधियाना येथील कॉंग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांचे एक ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये खासदार बिट्टू यांनी कंगना रनौतला हिमाचलचे सडलेले सफरचंद म्हटले आहे. आता यावर कंगना काय रिप्लाय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Congress mp kangana called himanchal rotten apple)
या विषयावर बोलताना खासदार बिट्टू म्हणाले की, मला कंगनाला हे स्पष्ट सांगायचे आहे की, आमच्या पंजाबी लोकांमध्ये शेकडो समस्या असतील परंतु आम्ही बाहेरील लोकांना आमच्यामध्ये कधीच घुसू देत नाहीत. मला खात्री आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्याप्रमाणे विरोध केला त्यानंतर हिमाचलमध्ये कंगनाच्या प्रवेशावर बंदी घातली जाईल आणि हिमाचलमधील तरुणांनी कंगनाला धडा शिकवेल यानंतर कंगना लपून बसण्यासाठी फक्त नरेंद्र मोदींच्या घरी जाऊ शकेल प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनौत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. कंगनाने विविध मुलाखतीत आपली बदनामी केली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला. त्यांनी कंगना विरोधात अंधेरी कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला . जावेद अख्तर यांनी अभिनेता ऋतिक रोशन याच्याविरोधात बोलू नये यासाठी दबाव टाकल्याचा आरोप कंगना रनौतने अनेक मुलाखतींमध्ये केला आहे. त्यामुळे या आरोपांविरोधात जावेद यांनी कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीत जावेद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितलं होतं की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझं नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांचे शब्द होते. त्यांना असं का वाटतं की, मी जर ऋतिक रोशनची माफी नाही मागितली तर मला आत्महत्या करावी लागेल. ते माझ्यावर इतक्या जोरात ओरडले होते की माझे पाय कापयला लागले होते”, अशी कंगना त्या मुलाखतीत म्हणाली होती.
संबंधित बातम्या :
Kangana Ranuat | ‘तुम्हाला निलंबित केले पाहिजे’, कंगना रनौत महिला आयपीएस अधिकाऱ्यावर संतापली!
Kangana Ranaut | चौकशी होणारच! कंगना रनौतसह बहिण रंगोली चंदेलला वांद्रे पोलिसांची नोटीस
(Congress mp kangana called himanchal rotten apple)