Animal : ‘पॅड चेंज करने में इतना नाटक…’, रणबीर कपूर याचे वादग्रस्त डायलॉग
Animal : 'पॅड चेंज करने में इतना नाटक...', 'आओ मेरे जूते...', ‘ॲनिमल’ सिनेमातील वादग्रस्त डायलॉग... सर्वत्र खळबळ... सर्वत्र फक्त आणि फक्त ॲनिमल’ सिनेमाची तुफान चर्चा.. सिनेमा बॉक्स ऑफिसवर करतोय दमदार कमाई...
मुंबई | 6 डिसेंबर 2023 : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमाची तुफान चर्चा रंगल्या आहे. सिनेमातील काही सीन आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होत आहे. सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत असताना सिनेमातील काही डायलॉग मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. रणबीर कपूर याचे काही डायलॉग तुफान चर्चेत आहेत.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणबीर कपूर याच्या डायलॉगची चर्चा रंगली आहे.
‘ॲनिमल’ सिनेमातील एका डायलॉग रणबीर कपूर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला म्हणतो, ‘महिने में चार दिन पॅड चेंज करने के लिए इतना नाटक करती है तू…’ सिनेमात रणबीर कपूर याचा आणखी एक डायलॉग आहे. ज्यामध्ये अभिनेता म्हणतो, ‘शादी मैं डर होना चाहिए, पकड होनी चाहिए…’
सिनेमात रणबीर आणि तृप्ती डिमरी यांचा एक सीन आहे, ज्यामध्ये रणबीर अभिनेत्रीला म्हणतो, ‘आओ… मेरे जूते चाटो..’ ‘ॲनिमल’ सिनेमातील डायलॉग देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एवढंच नाही तर, सिनेमातील दोघांचा इंटिमेट सीन देखील तुफान चर्चेत आहे.
सिनेमातील आणखी एका सीनबद्दल सांगायचं झालं तर, रणबीर, रश्मिका हिला म्हणतो, ‘में तुम्हे जोर से थप्पड मारुंगा… पहला किस हुआ… पहला सेक्स हुआ… पहला थप्पड नहीं हुआ ना…’, अनेक गोष्टींमुळे सिनेमा चर्चेत आहे.
पुढे रणबीर कपूर सिनेमात मेहुण्याला जीवे मारण्याची धमकी देतो. तेव्हा अभिनेता म्हणतो, ‘दो जवान बहनें घर में विधवा होंगी… सफेद साडी मैं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘ॲनिमल’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘ॲनिमल’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
दिग्दर्शक संदीर रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ सिनेमाने आतापर्यंत 283.74 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशात सिनेमा येत्या दिवसांत किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सांगायचं झालं तर, ‘ॲनिमल’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. पण सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली…
दिग्दर्शक संदीर रेड्डी वंगा यांनी यापूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबिर सिंग’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं. दिग्दर्शक संदीर रेड्डी वंगा दिग्दर्शित दोन्ही सिनेमे वादाच्या भोवऱ्यात अडकले. पण दोन्ही सिनेमांनी दमदार कमाई केली. आता ‘ॲनिमल’ सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल… पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.