Saisha Bhoir | साईशा भोईर हिच्या आईच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त, सासरच्या मंडळींचं धक्कादायक वक्तव्य

बालकलाकार साईशा भोईर हिच्या आईच्या अडचणीत मोठी वाढ; घराच्या झडतीत पोलिसांनी महत्त्वाची कागदपत्रे केली जप्त; पण सासरच्या मंडळींनी केलेलं वक्तव्य धक्कादायक

Saisha Bhoir | साईशा भोईर हिच्या आईच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त, सासरच्या मंडळींचं धक्कादायक वक्तव्य
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 3:36 PM

मुंबई | बालकलाकार साईशा भोईर हिच्या आईच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. साईशा हिची आई पूजा हिला आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मे महिन्यात पूजा हिचं गुपित उघड झाल्यानंतर पोलिसांनी साईशा हिच्या आईला अटक केली आहे. सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. बुधवारी पोलिसांनी साईशा भोईर हिच्या आईच्या घराची झडती घेतली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे झडतीमध्ये पोलिसांनी काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने पूजाच्या कोठडीत वाढ केली होती. ज्यामुळे पूजा अद्यापही कोठडीत आहे, तर पूजाचा पती विशांत भोईर गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी बुधवारी कल्याण येथे असलेल्या पूजाच्या घराची झडती घेतली आहे.

तपासादरम्यान, पोलिसांना पूजाच्या घरातून आर्थिक व्यवहार आणि बँक खात्यांशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. एवढंच नाही तर, पूजाने गहान ठेवलेल्या दागिन्यांच्या पावत्या देखील पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. ज्यामुळे पूजाच्या अडचणीमध्ये अधिक वाढ होईल याची शक्यता नकारता येत नाही.

हे सुद्धा वाचा

पूजा हिच्या दागिन्यांबद्दल सांगायचं झालं तर, मिळालेल्या माहितीनुसार, तिच्याकडे २७ लाख रुपयाचं दागिने होते आणि २६ लाख रुपयांचे दागिने पूजाने गहाण ठेवले होते. सध्या याप्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. झडती दरम्यान पोलिसांनी पूजाच्या सासरच्या मंडळींची देखील चौकशी केली आहे.

पूजा हिच्या सासरच्या मंडळींनी देखील धक्कादायक खुलासा केला आहे. पूजाला सांगितलं होतं व्यवसायापासून दूर राहा. पण तिने कधीही आमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. आमच्याकडे तिने कायम दुर्लक्ष केलं… असा धक्कादायक खुलासा पूजाच्या सासरच्या मंडळींनी दिला आहे.

पूजा आणि पती विशांत भोईर यांनी अनेकांची फसवणूक केली आहे. ‘फर्म’च्या नावाखाली दोघांनी अनेकांची फसवणूक केली आहे. पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक केली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.