Corona update: ‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेला कोरोनाची लागण

टिव्ही मालिकांतील प्रसिद्ध चेहरा अभिनेत्री गौतमी देशपांडेला कोरोनाची लागण झाली आहे. इस्टाग्रामवरून तिने याबाबतची माहिती दिली आहे.

Corona update: 'माझा होशील ना' फेम गौतमी देशपांडेला कोरोनाची लागण
गौतमी देशपांडे
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 5:21 PM

मुंबई : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडलेत. टिव्ही मालिकांतील प्रसिद्ध चेहरा अभिनेत्री गौतमी देशपांडेला (gautami deshpande) कोरोनाची लागण झाली आहे. इस्टाग्रामवरून तिने याबाबतची माहिती दिली आहे.

गौतमी देशपांडेने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय म्हटलंय?

आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं गौतमीने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून सांगितलं आहे. कोरोनाप्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका. हा काळ कठीण आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका. घरी रहा, सुरक्षित रहा, असं गौतमीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. गौतमी पुढे म्हणते, ‘लस घ्या. मला मान्य आहे की लस घेऊनही कोरोनाही लागण होतेय. पण लस घेतलेल्यांना कोरोनाचा त्रास कमी जाणवतोय. त्यामुळे लवकरात लवकर लस घ्या. स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. घरी रहा सुरक्षित रहा’

‘माझा होशील ना’ या मालिकेतून गौतमीला वेगळी ओळख मिळाली. ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांच्या यादीत होती. या मालिकेचा दुसरा भाग येणार का विषयी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी चर्चा रंगली होती. गौतमीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. “माझा होशील ना या मालिकेबद्दल मला तुम्हाला काही सांगायचे आहे. मला नेमकं काय सांगायचे आहे, याचा तुम्हाला अंदाज लावता येईल का? ही माहिती माझा होशील ना पर्व 2 विषयी असेल का ?” असं ती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली. त्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा रंगली.

कोणकोणते कलाकार कोरोना पॉझिटिव्ह

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झालीये. त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खान, कॉमेडियन वीरदास हे कलाकार सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

संबंधित बातम्या

महिला आयोगाच्या पत्रानंतर मांजरेकरांची माघार, ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवला

शिल्पा शेट्टी मुलगी समिशाला देतेय भूतदयेचे धडे, जखमी कावळा बघून शिल्पाच्या लेकीने जोडले हात

Video : अपघातानंतर पहिल्यांदाच समोर आला सहदेव दिरदो, ‘बचपन का प्यार’ फेम कलाकारानं काय म्हटलं, पाहा…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.