Crime Patrol: ‘क्राईम पेट्रोल’मध्ये दाखवलं श्रद्धा मर्डर केस; वादानंतर Sony ने मागितली माफी, सांगितलं सत्य

क्राईम पेट्रोलमधील एपिसोडमुळे सोनी वाहिनीला मागावी लागली माफी; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

Crime Patrol: 'क्राईम पेट्रोल'मध्ये दाखवलं श्रद्धा मर्डर केस; वादानंतर Sony ने मागितली माफी, सांगितलं सत्य
'क्राईम पेट्रोल'मध्ये दाखवलं श्रद्धा मर्डर केस; वादानंतर Sony ने मागितली माफीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 7:52 AM

मुंबई: ‘क्राईम पेट्रोल’च्या एका एपिसोडमुळे सोनी वाहिनी वादात सापडली आहे. या शोच्या नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये एका तरुणीची कथा दाखवण्यात आली होती. या तरुणीचा पार्टनर तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करतो. क्राईम पेट्रोलच्या या एपिसोडमध्ये दिल्लीतल्या श्रद्धा वालकरची घटना दाखवल्याची तक्रार काही प्रेक्षकांनी केली.

श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला यांच्या घटनेचा तपास अद्याप दिल्ली पोलीस करत आहे. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण देश हादरलं होतं. अशातच श्रद्धाच्या हत्येच्या घटनेशी मिळती जुळती कथा क्राईम पेट्रोलमध्ये पाहिल्यानंतर प्रेक्षकांना धक्काच बसला. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी आता वाहिनीने जाहीर माफी मागितली आहे.

हे सुद्धा वाचा

क्राईम पेट्रोलच्या या एपिसोडमध्ये दाखवलेल्या कथेत तथ्यांशी छेडछाड केल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली. म्हणून सोशल मीडियावर वाहिनी आणि शो विरोधात बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला. लोकांचा राग आणि नाराजी पाहता सोनी वाहिनीने त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हा एपिसोड काढून टाकला.

सोनी वाहिनीचं स्पष्टीकरण –

सोनी वाहिनीकडून पोस्ट करण्यात आलेल्या या जाहीर माफिनाम्यात लिहिलं आहे, ‘क्राईम पेट्रोलमध्ये नुकताच दाखवण्यात एपिसोड हा काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेवर आधारित असल्याचं काही प्रेक्षकांनी म्हटलंय. आम्ही हे सांगू इच्छितो की ही एपिसोडमध्ये दाखवलेली कथा ही काल्पनिक आहे. 2011 मध्ये घडलेल्या काही घटनांवरून याची काल्पनिक लिहिण्यात आली आहे. त्यामुळे नुकत्याच घडलेल्या घटनेशी याचा काही संबंध नाही. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो. हा एपिसोड आम्ही हटवला आहे.’

शोमध्ये नेमकं काय दाखवलं?

क्राईम पेट्रोलच्या या एपिसोडमध्ये आफताबला हिंदू मुलगा मिहिर आणि श्रद्धा वालकरला ख्रिश्चन मुलगी ॲनाच्या रुपात दाखवलं गेलं. या दोघांचं लग्न मंदिरात झाल्याचं एपिसोडमध्ये दाखवलं गेलं. यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला. यानंतर काही क्लिपसुद्धा व्हायरल झाले होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.