कुरळे केस, गालावर खळी.. हुबेहूब नेहा कक्करसारखी दिसणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

नेहा कक्करच्या 'हल्का हल्का' या गाण्यावर अभिनय करणाऱ्या तरुणीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेहासारखाच गोल चेहरा, डोळे, कुरळे केस आणि गालावर खळी असा या तरुणीचा लूक पहायला मिळतोय. हुबेहूब नेहासारख्या दिसणाऱ्या या तरुणीचं नाव बिपाशा आहे.

कुरळे केस, गालावर खळी.. हुबेहूब नेहा कक्करसारखी दिसणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल
Neha KakkarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 11:03 AM

मुंबई : सलमान खान, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींसारखे हुबेहूब दिसणाऱ्यांना आपण अनेकदा पाहिलंय. त्यांना पाहिल्यावर चाहतेसुद्धा संभ्रमात पडतात. मात्र सध्या अशा एका गायिकेसारखी हुबेहूब दिसणारी तरुणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जी बॉलिवूडवर राज्य करतेय. या गायिकेची गाणी प्रदर्शित होताच हिट होतात तर सोशल मीडियावर त्यावरून लाखो नेटकरी व्हिडीओ बनवतात. ही गायिका आहे नेहा कक्कर. नेहासारखी हुबेहूब दिसणाऱ्या एका तरुणीच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या दोघांच्या दिसण्यातील साम्य पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत.

नेहा कक्करच्या ‘हल्का हल्का’ या गाण्यावर अभिनय करणाऱ्या तरुणीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेहासारखाच गोल चेहरा, डोळे, कुरळे केस आणि गालावर खळी असा या तरुणीचा लूक पहायला मिळतोय. हुबेहूब नेहासारख्या दिसणाऱ्या या तरुणीचं नाव बिपाशा आहे. इन्स्टाग्रामवर ही तरुणी बऱ्यापैकी सक्रिय असून तिने स्वत:चे अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे व्हिडीओ पाहून ही तरुणी नेहा कक्करच आहे की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. बिपाशाच्या या व्हिडीओला 2 लाख 36 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. ‘तू खरंच खूप क्युट आहेस, हुबेहूब नेहा कक्करसारखी दिसतेस’, असं एकाने लिहिलंय. तर ‘मी संभ्रमात पडलोय, तू नेहा कक्कर आहेस की हुबेहूब तिच्यासारखी दिसणारी दुसरी कोणी’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Bipasha Axom (@bipasha.axom)

नेहा कक्करची गाणी तुफान गाजत असली तरी अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी तिने फाल्गुनी पाठकच्या ‘मैंने पायल है छनकाई’ या गाण्याचा रिमेक प्रदर्शित केला होता. ‘ओ सजना’ असं नाव तिने या रिमेकला दिलं होतं. मात्र हा रिमेक नेटकऱ्यांना अजिबात आवडला नव्हता. फाल्गुनीच्या चाहत्यांनीही तिला जोरदार ट्रोल केलं होतं. तर दुसरीकडे स्वत: फाल्गुनी पाठनेही नेहावर निशाणा साधला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.