‘दबंग 3’ अभिनेत्रीने कुटुंबियांच्या विरोधात केली 2 लग्न, पश्चाताप व्यक्त करत म्हणाली, ‘चुकीच्या व्यक्ती…’
Actress Life: कुटुंबियांच्या विरोधात जाऊन 'दबंग 3' फेम अभिनेत्रीने केली दोन लग्न, दोन्ही नवऱ्यांनी सोडली साथ, मुलांच्या भविष्याची चिंता व्यक्त करत म्हणाली, 'चुकीच्या व्यक्ती...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा...
झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या ‘दबंग 3’ आणि ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेत्री हेमा शर्मा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. हेमा शर्मा ‘बिग बॉस 18’ च्या घरातून बाहेर पडणारी पहिली अभिनेत्री आहे. शोमधून फार लवकरच बाहेर पडल्यामुळे अभिनेत्रीने खंत व्यक्त केली. ‘बिग बॉसच्या घरातील अनुभव चांगला होता. पण शोमधून बाहेर पडल्यामुळे दुःख होत आहे. जेलमध्ये सुरवातीचे 6 दिवस कठीण होते. बाहेर आल्यानंतर दोन दिवस इतर स्पर्धकांना समजण्यासाठी गेले आणि तिसऱ्या दिवशी मी बेघर झाले…’ असं म्हणत हेमाने खंत व्यक्त केली.
नुकताच झालेल्या मुलाखतीत हेमा म्हणाली, ‘प्रत्येकाला शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा असते. पण तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे तेच होतं. माझं खासगी आयुष्य सार्वजनिक होणं आणि जगाला माझ्याबद्दल कळणं माझ्या नशिबात होतं. मी एका सेल्फ-मेड महिला आहे. माझं कुटुंब इंडस्ट्रीतील नाही… माझा कोणा गॉडफादर नाही…’
View this post on Instagram
‘मी जिद्दी आहे, सुंदर देखील आहे. पण मी एक चांगली व्यक्ती नाही. कारण मी माझ्या मनाचं ऐकते. मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. पण मी कधीच माघार घेतली नाही. मी एकटीने मेहनत घेतली आहे.’ असं देखील हेमा म्हणाली.
View this post on Instagram
आयुष्यात झालेल्या चुकांबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मी काही निर्णय घेतले आणि चुका केल्या आहेत. झालेल्या चुकांचा मी स्वीकार करते. मी दोन लग्न केली आहेत. मला दोन्ही लग्न करताना विचार करायला हवा होता. मी आयुष्यात चुकीच्या व्यक्तींची निवड केली.’ मुलांच्या भविष्याबद्दल देखील हेमाने मोठं वक्तव्य केलं. ‘शोमुळे माझ्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. मला माझं वर्तमान आणि मुलांचं भविष्य चांगलं बनवायचं आहे…’ असं देखील हेमा शर्मा म्हणाली. सध्या सर्वत्र हेमा शर्मा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.