AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादा कोंडके यांनी दिलेला गुरूमंत्र आजही विसरले नाहीत अशोक सराफ; कोणता होता ‘तो’ मंत्र?

Dada Kondke | 'दादांनी जणू मला हा गुरूमंत्रच दिला...', दादा कोंडके यांच्या आठवणीत अभिनेते अशोक सराफ भावुक... सध्या सर्वत्र अशोक मामा यांनी व्यक्त केलेल्या भावनांची चर्चा

दादा कोंडके यांनी दिलेला गुरूमंत्र आजही विसरले नाहीत अशोक सराफ; कोणता होता 'तो' मंत्र?
| Updated on: Sep 07, 2023 | 2:45 PM
Share

मुंबई : 7 सप्टेंबर 2023 | गुडघ्यापर्यंतच्या चड्डी, लोंबणारी नाडी, त्यावर हाफ हाताचा कुर्ता, केसांचा पैलवान कट, बारीक मिशी असणाऱ्या अभिनेते दादा कोंडके यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. दादा कोंडके यांनी ‘तांबडी माती’ सिनेमातून करियरची सुरुवात केली. पण ‘सोंगाड्या’ सिनेमानंतर दादा कोंडके यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. दादा कोंडके आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या विनोदी आठवणी आजही चाहत्यांना पोट धरुन हासण्यास भाग पाडतात. दादा कोंडके यांची ९१ वी जयंती मंगळवार ८ ऑगस्टला झाली. या निमित्ताने झी टॉकीज वाहिनीवर ६ ऑगस्टपासून दर रविवारी दादांचे ज्युबिली स्टार सिनेमे दाखवण्यात आले.

दरम्यान, दादा कोंडके यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे कोण चालवणार, चाहत्यांना पोट धरुन कोण हासवणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. दादा कोंडके यांच्या विनोदाचा वारसा पुढे समर्थपणे पेलला तो इंडस्ट्रीतील सर्वांचे लाडके अभिनेते सराफ यांनी. दादा कोंडके यांनी अशोक सराफ यांना एक गुरुमंत्र दिला होता.

दादा कोंडके यांनी दिलेला गुरुमंत्री आजही अशोक मामा विसरु शकले नाहीत. ‘दादांचा विनोद कधीच ओढून ताणून नव्हता तर त्यामध्ये एक उत्स्फूर्तता होती. विनोदातील निखळता आणि विनोदी संवादातील उत्स्फूर्तता कशी आणायची हे मी दादांकडे पाहून शिकलो. दादांनी जणू मला हा गुरूमंत्रच दिला होता. दादांच्या विनोदातील सहजता लोकांना इतकी भावली की दादांचा सिनेमा म्हणजे ज्युबिली स्टार हे समीकरणच झालं.’

पुढे अशोक सराफ म्हणाले, ‘दादांमध्ये खूप टॅंलंट होतं. दादा पडद्यावरच नव्हे तर व्यक्तीगत आयुष्यातही हजरजबाबी होते. बोलताना त्यांना सहज विनोद सुचायचे. मला त्यांच्यातील आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांनी बहुतांश सिनेमे विनोदी ढंगातील करूनही त्यांचा विनोद प्रत्येकवेळी नवीनच वाटला.’ असं देखील अशोक मामा म्हणाले.

अशोक सराफ आणि दादा कोंडके यांनी अनेक सिनेमांमध्ये अनेक एकत्र स्क्रिन शेअर केली. ‘तुमचं आमचं जमलं’,‘पांडू हवालदार’ आणि ‘राम राम गंगाराम’ या तीन सिनेमांमध्ये अशोक सराफ आणि दादा कोंडके यांनी सोबत काम केलं.

दादा कोंडके यांचा सिनेमा

येत्या रविवारी १० सप्टेंबर ला ज्यूबली स्टार सीजन ची सांगता ‘आली अंगावर’ ह्या सिनेमाने होणार असून दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता हा सिनेमा झी टॉकीज वर पहायला मिळणार आहे. त्यामुळे दादा कोंडके यांचा ‘आली अंगावर’ सिनेमा नक्की पाहा…

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.