Daler Mehndi: दलेर मेहंदी यांचं फार्महाऊस सील; का झाली कारवाई?

दलेर मेहंदी यांचं दीड एकर परिसरातील फार्महाऊसवर कारवाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Daler Mehndi: दलेर मेहंदी यांचं फार्महाऊस सील; का झाली कारवाई?
Daler MehandiImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 10:13 AM

गुरूग्राम: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गुरुग्राम जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सोहनामधील दमदमा सरोवराजवळील तीन जणांच्या फार्महाऊसला सील केलं. यात दलेर मेहंदी यांच्याही फार्महाऊसचा समावेश आहे. नगर नियोजनसंबंधी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबद्दलची माहिती दिली. याठिकाणी अनधिकृतरित्या फार्महाऊस बांधण्यात आल्याचं जिल्हा नगर नियोजक अमित मधोलिया म्हणाले. या तिन्ही फार्महाऊसना सील करण्यात आलं आहे.

“सरोवराच्या परिसरात अनधिकृतरित्या हे फार्महाऊस बांधण्यात आले होते. तिन्ही फार्महाऊस सील करण्यात आले आहेत. कोणत्याही परवानगीशिवाय अरवली रेंजमध्ये हे बांधकाम करण्यात आलं होतं”, अशी माहिती अमित मधोलिया यांनी दिली.

सोन्या घोष विरुद्ध हरयाणा राज्य प्रकरणात एनजीटीच्या आदेशांचं पालन करण्यासाठी पोलीस दलाच्या मदतीने तीन फार्महाऊसविरोधात ही मोहीम राबवण्यात आली.

हे सुद्धा वाचा

डीटीपी मधोलिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एटीपी सुमीत मलिक, दिनेश सिंह, रोहन आणि शुभम यांच्यासह ही कारवाी केली. ड्युटी मॅजिस्ट्रेट लच्छिराम, नायब तहसीलदार, सोहना यांच्या उपस्थितीत फार्महाऊस सील करण्यात आले. तीन फार्महाऊसपैकी दलेर मेहंदी यांचं फार्महाऊस दीड एकर परिसरात बांधण्यात आलं आहे.

दलेह मेहंदी याआधीही मानवी तस्करीप्रकरणी वादात सापडले होते. पतियाळा ट्रायल कोर्टाने या 19 वर्षे जुन्या प्रकरणात दलेर मेहंदी यांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 16 मार्च 2018 रोजी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

दलेर मेहंदी पूर्वी परदेशात शो करण्यासाठी जायचे. त्यांच्या टीमसह 10 जणांना बेकायदेशीररीत्या सदस्य बनवून अमेरिकेला पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. ज्याच्या मोबदल्यात त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप होता. 2003 मध्ये दलेर मेहंदी यांचा भाऊ समशेर सिंग यांच्याविरुद्ध मानवी तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तपासादरम्यान दलेर मेहंदी यांचंही नाव समोर आलं होतं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.