Fatima Sana Shaikh: ‘दंगल गर्ल’ फातिमा करतेय लग्नाची तयारी? आमिरच्या लेकीनेही केली कमेंट

फातिमा सना शेखने दिले लग्नाचे संकेत? आमिर खानची मुलगी आयराने दिली अशी प्रतिक्रिया

Fatima Sana Shaikh: 'दंगल गर्ल' फातिमा करतेय लग्नाची तयारी? आमिरच्या लेकीनेही केली कमेंट
Fatima Sana ShaikhImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 9:22 AM

मुंबई: ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री फातिमा सना शेख नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आता तिने इन्स्टाग्रामवर एक अशी पोस्ट लिहिली आहे, जी वाचून फातिमा लवकरच लग्नाचा निर्णय घेणार की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. फातिमाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. याच फोटोशूटचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र त्याच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

बॅकलेस टॉप आणि हाय वेस्ट पँट्स असा हा तिचा लूक या फोटोंमध्ये पहायला मिळतोय. विंटेज कारजवळ परफेक्ट पोझ देत तिने हे सुंदर फोटोशूट केलं आहे. ‘करावं की करू नये.. हाच मोठा प्रश्न आहे’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

हे सुद्धा वाचा

कमेंट बॉक्समध्ये आमिर खानची मुलगी आयरा खान हिनेसुद्धा फातिमासाठी कमेंट केली आहे. आयराने फातिमाच्या या फोटोंवर बरेच इमोजी पोस्ट केले आहेत. तर अनेकांनी फातिमाला लग्नाविषयी प्रश्न विचारला आहे.

गेल्या वर्षी जेव्हा आमिर खान आणि किरण रावने त्यांचा घटस्फोट जाहीर केला, तेव्हा फातिमाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. फातिमामुळेच या दोघांचं नातं तुटलं, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता.

15 वर्षांच्या संसारानंतर आमिर आणि किरण यांनी घटस्फोट घेतला. 2005 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. आमिर आणि किरण यांनी ज्यावेळी घटस्फोट जाहीर केला, त्यावेळी ट्विटरवर अचानक फातिमाचं नाव ट्रेंड होऊ लागलं होतं. ‘दंगल’ आणि ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटांनंतर आमिर आणि फातिमा यांच्यात काहीतरी शिजत असल्याची जोरजार चर्चा होती. मात्र फातिमाने वेळोवेळो या चर्चांना अफवा असल्याचं म्हणत नाकारलं होतं.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.