Zaira Wasim | ‘तुमच्यासाठी आम्ही हे करत…’, बुरख्यातील मुलीबद्दल झायरा वसीम हिचं मोठं वक्तव्य

बुरख्यातील एका मुलीचा फोटो पोस्ट करत 'दंगल गर्ल' झायरा वसीम हिने अनेकांना पुन्हा खडसावलं, म्हणाली, 'प्रत्येकजण माझ्या आजू-बाजूला..'

Zaira Wasim | 'तुमच्यासाठी आम्ही हे करत...', बुरख्यातील मुलीबद्दल झायरा वसीम हिचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 11:43 AM

मुंबई : झगमगत्या विश्वाला राम राम ठोकत झायरा वसीम गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून झायरा तिचं मत कायम मांडत असते. आता देखील झायरा हिने हिजाबच्या समर्थनार्थ आपलं मत सर्वांसमोर मांडलं आहे. गेल्या वर्षी कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवरून झालेल्या वादाच्या वेळी तिने पुढे येऊन स्वतःचं मत मांडलं होतं. आता देखील झायराने हिजाबच्या समर्थनार्थ सोशल मीडियाच्यामाध्यमातून अनेकांना खडसावलं आहे. सोशल मीडियावर एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी बुरख्यात जेवताना दिसत आहे. यावर तिच्या निवडीबद्दल सांगत झायरा हिने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या झायराची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एका सोशल मीडिया युजरने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये एक मुस्लिम मुलगी बुरख्यात आहे आणि ती जेवतानाही बुरखा काढून जेवत नाही. हा फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीने विचारले आहे की ही माणसाची निवड आहे का? यावर झायरा वसीम हिने स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. सध्या सर्वत्र झायराची पोस्ट चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा

रिट्विट करत झायरा वसीम म्हणाली, ‘नुकताच मी एका लग्न सोहळ्यात उपस्थित होती. तेव्हा मी देखील याच पद्धतीत जेवली. ही पूर्णपणे माझी निवड आहे. चारही बाजूने प्रत्येकजण माझ्याकडे बघत बुरखा काढून जेवण कर असं सांगत होते.. हे तुमच्यासाठी आम्ही करत नाही. त्यामुळे यासोबत डील करायला शिका..’

झायराच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘अगदी बरोबर.. तुझं उत्तर मला आवडलं…’ तर दुसरा युजर म्हणाला, ‘झायरा तू ग्रेट आहेस…’ सध्या सर्वत्र झायरा वसीम हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. शिवाय तिच्या पोस्टवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

झायरा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, प्रसिद्धीझोतात आल्यानंतर तिने बॉलिवूडचा निरोप घेतला. बॉलिवूड इंडस्ट्री (Film Industry) आणि ग्लॅमरविश्वात येण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मनोरंजनविश्वात आल्यानंतर काहींनी अपेक्षित यश मिळतं, तर काहींना भरपूर स्ट्रगल करावा लागतो. या इंडस्ट्रीत असेही कलाकार आहेत, ज्यांना खूप चांगली प्रसिद्धी मिळाली, तरीसुद्धा त्यांनी यशाच्या शिखरावर असताना अभिनय क्षेत्राला रामराम करण्याचा निर्णय घेतला. ‘दंगल गर्ल’ झायरा वसिम (Zaira Wasim) हिने देखील बॉलिवूडचा काही वर्षांपूर्वी निरोप घेतला.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.