दाऊद इब्राहिम याच्या लेकीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्री फिक्या, तिचा फोटो पाहून म्हणाल…
Dawood Ibrahim Daughter : दाऊद इब्राहिम याने संपत्तीचा मोठा हिस्सा दियाल जावयाला! दाऊदच्या लेकीला पाहून बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींना विसराल... पाहा फोटो, सध्या सर्वत्र दाऊद इब्राहिम आणि त्याच्या लेकीची चर्चा...
मुंबई | 23 डिसेंबर 2023 : मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) गेल्या काही दिवसांपासू प्रकृतीमुळे चर्चेत आहे. दाऊद इब्राहिम याच्यावर विष प्रयोग करुन, त्याला संपवण्याचा कट रचण्यात आल्याची देखील चर्चा रंगत आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची दहशत होती. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचं नाव देखील कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्यासोबत जोडण्यात आलं. अनेक सुंदर अभिनेत्री दाऊत याच्या जाळ्यात अडकल्या होत्या.
अभिनेत्रींसोबत दाऊत याचे अनेक फोटो देखील इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले होते. याच दरम्यान, दाऊत याच्या लेकीचा देखील एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आता देखील दाऊत याच्या लेकीचा फोटो तुफान चर्चेत आहे. दाऊत याच्या लेकीच्या लग्नातील फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
दाऊत याला दोन मुली आहेत. त्याच्या मोठ्या मुलीचं नाव माहरुख तर लहान मुलीचं नाव माहरीन असं आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियांदाद यांचा मुलगा जुनैद मियांदादसोबत माहरुखचे लग्न झाले आहे. जुनैद आणि माहरुखचं लग्न 2006 मध्ये झालं होतं. लग्न मोठ्या रॉयल पद्धतीत झालं.
दुबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये माहरुखचा निकाह पार पडला. माहरुख हिच्या लग्नादरम्यान समोर आलेल्या फोटोंमध्ये ती पूर्णपणे दागिन्यांमध्ये सजलेली दिसत होती. लग्नानंतर दाऊद इब्राहिम याची लेक माहरुख आणि जावई जुनैद प्रचंड रॉयल आयुष्य जगत आहेत. शिवाय दाऊत याने त्याच्या संपत्तीतील मोठा हिस्सा लेक आणि जावयाच्या नावावर केला आहे.
‘या’ अभिनेत्रींसोबत होते डॉन दाऊत याचे संबंध
अनेक सुंदर मुलींसोबत डॉनचे संबंध होते. या यादीमध्ये बॉलिवूडच्या चार प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. डॉनसोबत नाव जोडल्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आल्या. मंदाकिनी, अनिता अयूब, महविश हयात, सुजाता यांच्यासोबत दाऊद इब्राहिम यांचे संबंध होते. आजही डॉनच्या लव्हस्टोरीबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात.