Dayaben : नवरात्रीत दयाबेनने वेधलं लक्ष; पहिल्यांदाच पती-मुलासोबत आली समोर

तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. यामध्ये दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानीचा मोठा चाहतावर्ग आहे. सहा वर्षांनंतर ती पती आणि मुलासोबत पहिल्यांदा पापाराझींसमोर आली आहे.

Dayaben : नवरात्रीत दयाबेनने वेधलं लक्ष; पहिल्यांदाच पती-मुलासोबत आली समोर
Disha VakaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 11:56 AM

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानी घराघरात लोकप्रिय आहे. दिशाने बाळंतपणासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र ती पुन्हा सेटवर परतलीच नाही. गेल्या सहा वर्षांपासून मालिकेचे निर्माते तिला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रेक्षकसुद्धा तिला परत आणण्याची जोरदार मागणी करत आहेत. अशातच दिशाचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये ती तिच्या पती आणि मुलासोबत दिसून आली. नवरात्रीमध्ये दिशा पारंपरिक गुजराती वेशभूषेत पहायला मिळाली. नवरात्रीच्याच एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ती पती आणि मुलासोबत आली होती.

दिशाने पती मयूर पडिया आणि मुलासोबत 16 ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता. यावेळी तिने गुलाबी आणि सोनेरी रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला होता. तर तिच्या पतीने गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती. दिशाच्या पतीने त्यांच्या मुलाला उचलून घेतलं होतं. लग्नानंतर पहिल्यांदाच दिशा पती आणि मुलासोबत पापाराझींसमोर आली होती.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Bollywoodsup (@bollywoodsup)

दिशाने 2017 मध्ये ही मालिका सोडली होती. बाळंतपणाच्या रजेवर गेलेली दिशा पुन्हा मालिकेत परतलीच नाही. तिला मालिकेत परत आणण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र दिशा सध्या तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं म्हटलं गेलं. काही महिन्यांपूर्वी दिशाचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दिशा तिचा पती मयूर आणि दोन मुलांसोबत पहायला मिळती होती. एका मंदिरात कुटुंबीयांसोबत बसून ती पूजा करताना दिसली.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत झालेल्या काही बदलांमुळे त्याची लोकप्रियता कमी होत असल्याचं पहायला मिळतंय. आतापर्यंत यातील बऱ्याच कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला आहे. यात दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, टप्पूची भूमिका साकारणारा भव्य गांधी आणि राज अनाडकत, तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांचा समावेश होता.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.