बॉलिवूडवर पुन्हा ‘अंडरवर्ल्ड’ दहशत? सलमान, शाहरुखनंतर आता ‘या’ अभिनेत्याला धमकी

बॉलिवूडमधील कलाकारांना धमक्या मिळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. सलमान आणि शाहरुख खाननंतर आता अभिनेता विक्रांत मेस्सी यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यांनी या धमक्यांबद्दल माहिती दिली.

बॉलिवूडवर पुन्हा 'अंडरवर्ल्ड' दहशत? सलमान, शाहरुखनंतर आता 'या' अभिनेत्याला धमकी
Death threat to Vikrant Massey
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 5:32 PM

सध्या बॉलिवूडवर पुन्हा ‘गुंडाराज’ आला की काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सलमान खाननंतर आता अनेक कलाकारांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. सलमान खान, शाहरुख खान आणि आता बॉलिवूडमधील अजून एका अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

अभिनेता विक्रांत मेस्सीला धमकी

अभिनेता विक्रांत मेस्सी याला ही धमकी मिळाली आहे. त्याच्या आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी पत्रकार परिषदेत विक्रांतने ही बाब उघड केली. सलमान खानला लॉरेन्स विष्णोई गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी मिळली, त्यानंतर शाहरुख खानलाही धमकी मिळाल्याचे म्हटले जाते. तसेच सलमान खानला तर वांरवार पैशांबाबत मागणी केली जात असल्याचे समोर येत आहे.

अशात आता अभिनेता विक्रांत मेस्सीला जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली. विक्रांत सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी पत्रकार परिषदेत विक्रांतने ही बाब उघड केली. बॉलिवूड सेलिब्रिटींना धमक्या मिळणे, ही आता एक सामान्य बाब झाली आहे. परंतु, एक कलाकार म्हणून ही एक गंभीर समस्या असल्याचं मत यावेळी अभिनेता विक्रांत मेस्सी यांने व्यक्त केलं.

चित्रपटाबाबत विक्रांतला धमक्या

‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट सत्य घटनेपासून प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट गुजरातच्या घटनेशी संबंधित आहे. या चित्रपटाबाबत विक्रांतला धमक्या येत असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, बॉलिवूड सेलिब्रिटींना धमक्या मिळणे, ही एक सामान्य बाब झाली आहे. परंतु, एक कलाकार म्हणून ही एक गंभीर समस्या असल्याचे यावेळी अभिनेता विक्रांत मेस्सी म्हणाला.

पत्रकार परिषदेत विक्रांतने धमक्यांबाबत खुलासा केला आहे. ” तो म्हणाला की, मला सतत धमक्या येत आहेत. माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील धमकी दिली जात असून यात अनेक धमकीचे संदेश आतापर्यंत मला प्राप्त झाले आहे. मी याबाबत आधी कोणालाच काही सांगितले नाही. कारण मला कोणी विचारले नाही. पण मला हे स्पष्ट करायचे आहे की, आम्ही कलाकार आहोत आणि कथा सांगतो. लोक काय विचार करतात आणि काय म्हणतात याकडे मी लक्ष देत नाही” असं म्हणत विक्रांतने धमक्यांबबात त्याचे मत व्यक्त केले.

रिलीजच्या आधीच चित्रपट वादात 

दरम्यान, ‘द साबरमती रिपोर्ट’ हा प्रदर्शनापूर्वीचा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही बदलण्यात आली आहे. चित्रपट यावर्षी 3 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण, लोकसभा निवडणूक आणि इतर कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला.

त्यात हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. आता हा चित्रपट 15 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सीशिवाय राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी तर निर्मिती एकता कपूर आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'.
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले...
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले....
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर.
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका.
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा.
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य.
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?.
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?.