चौदा महिन्यांच्या मुलीला शाळेत पाठवल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री जोरदार ट्रोल; अखेर सांगितलं कारण

डेबिनाने 2011 मध्ये अभिनेता गुरमीत चौधरीशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर डेबिनाला गरोदरपणात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. अखेर एप्रिल 2022 मध्ये तिने IVF द्वारे (इन विट्रो फर्टिलायजेशन) मुलीला जन्म दिला. त्यानंतर दुसऱ्यांदा ती नैसर्गिक पद्धतीने गरोदर झाली.

चौदा महिन्यांच्या मुलीला शाळेत पाठवल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री जोरदार ट्रोल; अखेर सांगितलं कारण
Debina BonnerjeeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 8:55 AM

मुंबई : टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री डेबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे काही काळापूर्वीच दोन गोंडस मुलींचे आई-बाबा झाले. हे दोघं सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. विविध पोस्ट आणि व्लॉगद्वारे ते सतत चाहत्यांच्या संपर्कात असतात. मात्र डेबिना अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोलिंगची शिकार होते. आता पुन्हा एकदा ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. नुकतंच तिने तिच्या 14 महिन्यांच्या मुलीला शाळेत पाठवण्यास सुरुवात केली आहे. हीच गोष्ट नेटकऱ्यांना आवडली नाही आणि त्यावरून त्यांनी डेबिनावर टीका करण्यास सुरुवात केली. या टीकाकारांना आता डेबिनाने उत्तर दिलं आहे.

डेबिना आणि गुरमीत यांना दोन मुली आहेत. लियाना आणि दिविशा अशी त्यांची नावं आहेत. नुकतंच तिने लियानाला प्लेस्कूलमध्ये पाठवण्यास सुरुवात केली. ती फक्त 14 महिन्यांची असल्याने नेटकऱ्यांनी डेबिनाकडे सवाल उपस्थित केला. याबद्दल आता तिने तिच्या व्लॉगद्वारे टीकाकारांना उत्तर दिलं आहे. डेबिनाने सांगितलं की ती तिच्या मुलीला फक्त 15 मिनिटांसाठी प्लेस्कूलमध्ये पाठवते. यामुळे ती काही काळासाठी व्यस्त असते आणि तिचा स्क्रीन टाइमसुद्धा कमी होतो. कारण घरी राहिल्यास ती सतत टीव्ही पाहण्याचा हट्ट करते, असं ती म्हणाली. “ही फक्त 15 मिनिटांची शाळा आहे. ती बाहेर खेळण्यासाठी जाते त्यापेक्षाही कमी वेळ आहे. तुम्हाला तुमच्या मुलांना व्यस्त ठेवावं लागतं. लोक आधी संयुक्त कुटुंबात राहायचे, पण आता विभक्त कुटुंबात राहिल्याने तुम्हाला तुमच्या मुलांना स्क्रीन्सपासून लांब ठेवावंच लागेल”, असं डेबिनाने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

“जर मी काहीच मार्ग काढला नाही तर ते टीव्ही बघत राहतील. त्यामुळे मी तिला शाळेत पाठवत आहे. माझ्यासाठी ही अतिरिक्त जबाबदारीच आहे. पावसाळ्यात मी ही जबाबदारी कशी पार पाडेन मलाच माहीत नाही. पण मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईन”, असंही तिने सांगितलं. डेबिना सात महिन्यांत दुसऱ्यांदा आई बनली होती. लग्नाच्या 11 वर्षांनंतर तिने लियानाला जन्म दिला होता. त्यानंतर लगेचच ती दुसऱ्यांदा गरोदर होती. त्यावेळीही डेबिनावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली होती.

डेबिनाने 2011 मध्ये अभिनेता गुरमीत चौधरीशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर डेबिनाला गरोदरपणात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. अखेर एप्रिल 2022 मध्ये तिने IVF द्वारे (इन विट्रो फर्टिलायजेशन) मुलीला जन्म दिला. त्यानंतर दुसऱ्यांदा ती नैसर्गिक पद्धतीने गरोदर झाली.

'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.