दुसऱ्या डिलिव्हरीनंतर डेबिनाची झाली अशी अवस्था; फोटो केले पोस्ट

सात महिन्यांतच दुसऱ्या बाळाला जन्म देणाऱ्या डेबिनाच्या पायांना सूज; सांगितला अनुभव

दुसऱ्या डिलिव्हरीनंतर डेबिनाची झाली अशी अवस्था; फोटो केले पोस्ट
Debina BonnerjeeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 10:09 AM

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री डेबिना बॅनर्जीने काही दिवसांपूर्वीच मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर डेबिनाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत स्वत:च्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर सात महिन्यांनी डेबिना दुसऱ्या मुलीला जन्म दिला. दुसऱ्यांदा बाळाला जन्म देणं किती कठीण होतं, याबद्दल डेबिनाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. याचसोबत तिने सुजलेल्या पायाचा फोटोसुद्धा पोस्ट केला आहे.

डिलिव्हरीनंतर हात-पाय सुजल्याचं डेबिनाने सांगितलं. दुसऱ्या फोटोमध्ये तिने पोस्टपार्टम बेली दाखवली. प्रत्येक संकटावर मात करत हळूहळू ठीक होत असल्याचं तिने म्हटलंय. ‘हे खरं आहे.. काही गोष्टी तुम्हाला आणखी मजबूत बनवतात. गेले काही महिने आणि दिवस खूप कठीण होते. लोकांचे सल्ले, शारीरिक सीमा, प्रोसिजरल अडचणी.. या सर्वांचा मी सामना केला. हळूहळू मी त्यातून बरी होत आहे’, असं तिने लिहिलं आहे.

तिसऱ्या फोटोमध्ये डेबिनाने तिच्या हातात बाळाचा हात घेतल्याचं पहायला मिळतंय. ‘हे सर्व माझ्या जादुई बाळासाठी होतं. मी आता पहिल्यापेक्षा अधिक सकारात्मक आणि धाडसी झाली आहे’, असं तिने या फोटोवर लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

डेबिना आणि टीव्ही अभिनेता गुरमीत चौधरी यांनी 15 फेब्रुवारी 2011 रोजी लग्न केलं होतं. लग्नाच्या 11 वर्षांनंतर डेबिना पहिल्यांदा गरोदर झाली. 3 एप्रिल 2022 रोजी डेबिनाने गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव लियाना असं आहे.

पहिल्या मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा डेबिना गरोदर होती. 11 नोव्हेंबर रोजी तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. 2008 मध्ये ‘रामायण’ या मालिकेच्या सेटवर डेबिना आणि गुरमीतची पहिल्यांदा भेट झाली होती. या मालिकेत गुरमीतने राम तर डेबिनाने सीतेची भूमिका साकारली होती. डेबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.