दीपिका पदुकोणचा ‘एक्स’ बॉयफ्रेंड बनला ‘बाबा’, निहार-नीतिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन!

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिचा एक्स बॉयफ्रेंड निहार पांड्या (Nihaar Pandya) ‘बाबा’ झाला आहे. त्याची पत्नी-गायिका नीति मोहन (Neeti Mohan) हिने एका मुलाला जन्म दिला आहे.

दीपिका पदुकोणचा ‘एक्स’ बॉयफ्रेंड बनला ‘बाबा’, निहार-नीतिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन!
निहार आणि नीति
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 12:25 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिचा एक्स बॉयफ्रेंड निहार पांड्या (Nihaar Pandya) ‘बाबा’ झाला आहे. त्याची पत्नी-गायिका नीति मोहन (Neeti Mohan) हिने एका मुलाला जन्म दिला आहे. नीति हिने आपली बहीण शक्ती मोहन हिच्यासोबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन, आई होण्याविषयी माहिती दिली आहे. 2019 मध्ये निहार आणि नीति लग्नाच्या बंधनात अडकले होते आणि आता एक चिमुकला सदस्य त्यांच्या घरी आला आहे (Deepika Padukone ex boyfriend Nihaar Pandya wife Neeti gives birth to baby boy).

नीतिची बहीण-अभिनेत्री शक्ती मोहन हिनी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करुन याबद्दल माहिती दिली आहे. नीति आणि निहारचा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘मुलगा झाला आहे.’ या फोटोमध्ये निहार नीतिच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे.

पाहा इन्स्टाग्राम पोस्ट

नीतिची दुसरी बहीण मुक्तीनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन नीति आई झाल्याची गोड बातमी दिली आहे. मुक्तीने चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर करताना लिहिले की, तिची बहीण आई झाली आहे. तिने एका गोड मुलाला जन्म दिला आहे.

‘डोहाळेजेवणा’चे फोटो चर्चेत

View this post on Instagram

A post shared by Mukti Mohan (@muktimohan)

नीतिची बहीण मुक्ती मोहन हिने तिच्या बहिणीच्या ‘बेबी शॉवर’ची अर्थात ‘डोहाळेजेवणा’चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. फोटोंमध्ये नीति लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. हे फोटो शेअर करताना मुक्तीने लिहिले होते की, ‘आम्ही चंद्रावर आहोत कारण तो जूनमध्ये येणार आहे. निहार आणि नीति यांचा जून बेबी. तुला माहित आहे आयुष्यभर आम्ही तुझे चांगले मित्र असू. मी तुझी गोलू मावशी आहे. या चीकू आणि टीनू मावशी! आम्ही आता आणखी प्रतीक्षा करू शकत नाही!’ (Deepika Padukone ex boyfriend Nihaar Pandya wife Neeti gives birth to baby boy)

नीतिच्या डोहाळजेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या जोडीचे चाहते त्यांच्या मुलाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होते. दोघांच्याही फोटोला चांगलीच पसंती मिळत आहे.

दीपिका माझा भूतकाळ!

दीपिका पदुकोणला डेट केल्याविषयी बोलताना निहारने एकदा सांगितले की, ती आता केवळ त्याचा भूतकाळ आहे आणि तो तिला विसरला आहे. तो म्हणाला, मला याबद्दल काहीही बोलण्याची इच्छा नाही. निहारने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘मेरीगोल्ड’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. निहारला बॉलिवूडमध्ये यश मिळवता आले नाही. पण तो आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे.

(Deepika Padukone ex boyfriend Nihaar Pandya wife Neeti gives birth to baby boy)

हेही वाचा :

Happy Anniversary | वडिलांची एक अट अन् त्याच दिवशी पार पडले अमिताभ-जया बच्चन यांचे लग्न!

इथे रियुनियन, तिथे ब्रेकअप, FRIENDS फेम 51 वर्षीय मॅथ्यू पेरीचे तिशीतील गर्लफ्रेण्डसोबत ब्रेकअप

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.