तिला दिलेले महागडे हिरे, भेटवस्तू विसरून..; सिद्धार्थ माल्याचा दीपिका पादुकोणवर गंभीर आरोप

बॉलिवूडमध्ये अशी अनेक नाती काही क्षणांसाठी प्रचंड चर्चेत आली होती. मात्र या नात्यांमध्ये जेव्हा कटुता आली, तेव्हा काहींनी विविध मुलाखतींमध्ये आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. व्यावसायिक विजय माल्या यांचा मुलगा सिद्धार्थ माल्यासोबत असंच काहीसं घडलं.

तिला दिलेले महागडे हिरे, भेटवस्तू विसरून..; सिद्धार्थ माल्याचा दीपिका पादुकोणवर गंभीर आरोप
सिद्धार्थ माल्या, दीपिका पादुकोणImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 9:37 AM

मुंबई : 13 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. नुकतीच तिने पती रणवीर सिंगसोबत ‘कॉफी विथ करण 8’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमधील दोघांच्या वक्तव्यांची नंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. इतकंच नव्हे तर काही वक्तव्यांवरून दीपिकाला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोलसुद्धा केलं होतं. आता दीपिकाच्या एका जुन्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. रणवीरशी लग्न करण्याआधी दीपिकाचं नाव रणबीर कपूर, सिद्धार्थ माल्या, युवराज सिंग यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं. प्रसिद्ध व्यावसायिक विजय माल्या यांचा मुलगा सिद्धार्थ माल्याशी तिचं नातं विशेष चर्चेत होतं. आयपीएल मॅचेसदरम्यान, डिनर डेट्स आणि इतर कार्यक्रमांमध्ये या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. आयपीएल मॅचदरम्यान दोघांनी केलेल्या किसची तुफान चर्चा झाली होती. मात्र ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांवर काही आरोप केले.

सिद्धार्थ आणि दीपिका त्यांच्या नात्याविषयी माध्यमांसमोर कधीच मोकळेपणे व्यक्त झाले नव्हते. मात्र ब्रेकअपनंतर दिलेल्या काही मुलाखतींमध्ये दोघांनी एकमेकांबद्दलची नाराजी बोलून दाखवली होती. सिद्धार्थने दीपिकाला ‘वेडी’ असं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे तिला दिलेल्या महागड्या भेटवस्तू कधीच परत मिळाल्या नसल्याची तक्रार त्याने केली होती. “दीपिका ही वेडी आहे. मी तिला सांगितलं होतं की माझ्या वडिलांनी त्यांचं कर्ज फेडल्यानंतर आणि सरकारने त्यांना मुक्त केल्यानंतर मी तिचे पैसे परत करेन. पण ती ऐकायला तयारच नव्हती. मी तिला दिलेले महागडे डायमंड्स, बॅग्स हे सर्व ती विसरली होती. तिच्या सुट्ट्यांवर खर्च केलेला पाण्यासारखा पैसा, तिच्या मित्रमैत्रिणींना दिलेल्या पार्ट्या या सर्व गोष्टींचा तिला विसर पडला होता”, असं सिद्धार्थने बोलून दाखवलं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Sid (@sidmallya)

दुसरीकडे दीपिका एका मुलाखतीत सिद्धार्थसोबतच्या ब्रेकअपविषयी व्यक्त झाली होती. “तो माझ्याशी खूप अजब वागू लागला होता. अखेरचं आम्ही जेव्हा डिनर डेटवर गेलो होतो, तेव्हा त्याने मला बिल भरायला सांगितलं होतं. माझ्यासाठी ही फार शरमेची बाब होती”, असं दीपिका म्हणाली होती. सिद्धार्थ माल्याने गर्लफ्रेंड जास्मिनशी नुकताच साखरपुडा केला. गेल्या काही काळापासून हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.