Oscars 2023 | ऑस्कर पुरस्कारादरम्यान ‘त्या’ क्षणी दीपिका पदुकोण झाली भावूक, पहा Video
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र त्यापैकी एका व्हिडीओने भारतीय प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आहे.
लॉस एंजेलिस : अँड द ऑस्कर गोज टू.. हे शब्द कानावर पडण्यासाठी जगभरातील कलाकार आतुरतेने वाट पाहत असतात. 95 वा ‘द अकॅडमी अवॉर्ड्स’ सोहळा नुकताच लॉस एंजेलिसमध्ये पार पडला. यंदाचा पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास ठरला. कारण एक नव्हे तर दोन ऑस्कर पुरस्कार भारताने पटकावले आहेत. संपूर्ण भारतीयांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण होता. भारताच्या एकूण तीन चित्रपटांना ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. त्यापैकी ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या लघुपटाने ‘सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट’ विभागात पुरस्कार पटकावला. तर सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बाजी मारली. नाटू नाटू या गाण्यावर ऑस्करच्या मंचावर दमदार डान्स परफॉर्मन्सही पार पडला. या परफॉर्मन्सची घोषणा अभिनेत्री दीपिका पदुकोणने मंचावर येऊन केली.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र त्यापैकी एका व्हिडीओने भारतीय प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आहे. या व्हिडीओमध्ये ती ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील एका खास क्षणी भावूक झाल्याचं पहायला मिळतंय. नाटू नाटू या गाण्यासाठी पुरस्कार जाहीर होताच संगीतकार एम. एम. किरवाणी आणि गीतकार चंद्रबोस हे ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मंचावर गेले. मंचावर किरवाणी यांनी जेव्हा भाषण देण्यास सुरुवात केली, तेव्हा दीपिका त्यांच्यासाठी टाळी वाजवताना भावूक झाली.
पहा व्हिडीओ
deepika when naatu naatu won the oscar ? pic.twitter.com/IuT5tgouhE
— Tara (@sarphiriiiii) March 13, 2023
दीपिकाचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याआधी नाटू नाटू गाण्याने प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कारही जिंकला होता. भारतीय सिनेसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ऑस्कर पुरस्कार जिंकण्यासाठी जगभरातील चित्रपटांमध्ये चुरस रंगलेली असते. ‘नाटू नाटू’ हे 2022 मधील सर्वांत हिट गाण्यांपैकी एक आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी हे गाणं गायलं आहे. चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं आहे.
RRR या चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. यामध्ये रामचरण, ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत.