आलिया, नयनतारा नाही तर, ‘ही’ आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री; एका सिनेमासाठी घेते पाण्यासारखा पैसा
expensive actress of bollywood : वयाच्या 38 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीने मोडलेत अनेक रोकॉर्ड, एका सिनेमासाठी अभिनेत्री घेते कोट्यवधी रुपये... तिच्या सौंदर्यावर चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील फिदा... सध्या सर्वत्र अभिनेत्रीचीच चर्चा...
मुंबई | 5 जानेवारी 2024 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलं. आज लोकप्रिय अभिनेत्रींना कोणत्याही ओळखीची गरज नाही. आज अशा अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, जिने अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यासोबत काम केलं आहे. पण 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया याच्या म्यूझिक अल्बममधून अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली. त्यानंतर स्वतःचं अभिनय कौशल्य वाढवण्यासाठी अभिनेत्रीने दिग्गज अभिनेते अनुपम खेर याच्या अभिनय शाळेत प्रवेश घेतला. आज अभिनेत्री गडगंज संपत्तीची मालकीण आहे. वयाच्या 38 व्या वर्षा अभिनेत्री अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेत्री नयनतारा नसून बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण आहे. आज दीपिका हिचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका हिची चर्चा रंगली आहे. दीपिका हिने ‘ओम शांती ओम’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्री कधीही मागे वळून पाहिलं नाही.
दीपिका हिच्याबद्दल सांगयचं झालं तर, एका सिनेमासाठी दीपिका हिला इतर अभिनेत्रींपेक्षा सर्वात जास्त मानधन मिळत. अभिनेत्री आलिया भट्ट हिने ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमासाठी 12 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. त्यानंतर ‘रॉकी ओर राणी की प्रेम कहाणी’ सिनेमासाठी अभिनेत्रीने 10 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. अभिनेत्री नयनतारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘जवान’ सिनेमासाठी अभिनेत्रीने 11 कोटी रुपये घेतले होते.
एका सिनेमासाठी दीपिका पादुकोण हिचं मानधन
दीपिका पादुकोण ही भारतातील सर्वात महागडी आणि श्रीमंत अभिनेत्री आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ सिनेमात दीपिका हिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका बजावली होती. तर ‘जवान’ सिनेमात अभिनेत्रीने पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली होती. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरलं. ‘पठाण’ सिनेमासाठी अभिनेत्रीने 15 कोटी रुपये आकारले होते.
दीपिका पादुकोण हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘फायटर’ सिनेमात अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत दिसणार आहे. ‘फायटर’ सिनेमा 25 जानेवरी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रिपोर्टनुसार, ‘फायटर’ सिनेमासाठी देखील अभिनेत्रीने 15 लाख रुपये मानधन घेतलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका पादुकोण हिची चर्चा रंगली आहे.