दीपिका पादुकोण आणि रणवीरमध्ये वाद?, चाहत्यांमध्ये चिंता, अभिनेत्याने थेट लग्नाचे सर्व फोटोच..
Ranveer singh and Deepika Padukone : बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही कायमच चर्चेत असते. दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. दीपिका पादुकोण हिने बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंह याच्यासोबत 2018 मध्ये लग्न केले.
बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह हे बाॅलिवूडमधील कायमच चर्चेत असणारी जोडी आहे. हेच नाही तर दीपिका पादुकोण ही लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. एका मागून एक चित्रपट दीपिका पादुकोण हिचे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. दीपिका पादुकोण ही बाॅलिवूडची टाॅप अभिनेत्री आहे. कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील दीपिका पादुकोण आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने 2018 मध्ये लग्न केले.
दीपिका पादुकोण ही सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. रणवीर सिंहने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दीपिका प्रेग्नंट असल्याचे जाहिर केले. नुकताच दीपिका पादुकोण ही बेबी बंपसह स्पाॅट झालीये. मात्र, रणवीर सिंह याने नुकताच असे काही केले की, विविध चर्चा जोरदार रंगताना दिसत आहेत.
रणवीर सिंह याने त्याच्या इंस्टाग्रामवरून थेट दीपिका पादुकोण आणि त्याच्या लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले. यानंतर आता विविध चर्चा या जोरदार रंगताना दिसत आहेत. रणवीर सिंह याने अचानकपणे लग्नाचे फोटो डिलीट केल्याने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. नेहमीच दीपिकासोबतचे खास फोटो शेअर करताना रणवीर दिसतो.
रणवीर सिंह याने लग्नाचे फोटो डिलीट केल्यानंतर अशी एक चर्चा तूफान रंगताना दिसतंय की, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्यामध्ये वाद झालाय आणि यामुळेच रणवीर सिंह याने लग्नाचे फोटो डिलीट केले. रणवीर सिंह याच्या इंस्टाग्रामवर आता एकून 133 पोस्ट शेअर केलेल्या आहेत. फक्त लग्नाचेच फोटो त्याने डिलीट केले.
हैराण करणारे म्हणजे फक्त फोटोच नाही तर रणवीर सिंह याने लग्नाचे सर्व व्हिडीओ देखील डिलीट केले आहेत. रणवीर सिंह याने शेअर केलेली शेवटची पोस्ट ही एका जाहिरातीची आहे. 14 नोव्हेंबर 2018 मध्ये यांचे लग्न झाले होते. यांच्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि अत्यंत जवळचे मित्र उपस्थित होते. रणवीर सिंह आणि दीपिकाच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.