Rashmika Mandanna च्या ‘डीपफेक’ व्हिडीओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर

Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या 'डीपफेक' व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, पुढे होणार तरी काय? काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा फेक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती...

Rashmika Mandanna च्या 'डीपफेक' व्हिडीओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 8:49 AM

मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा एक फेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. अभिनेत्रीच्या ‘डीपफेक’ व्हिडीओ प्रकरणी अनेक सेलिब्रिटींनी देखील आवाज उठवला होता. खुद्द रश्मिका हिने, ‘हे सर्व काही फार भयानक आहे…’ असं वक्तव्य केलं होतं. आता अभिनेत्रीच्या ‘डीपफेक’ प्रकरणी पोलीस देखील ॲक्शन मोडवर आले आहेत. डीपफेक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डीपफेक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांना तक्रार दाखल करुन घेतली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याची माहिती देखील पोलीसांनी दिली आहे. सध्या सर्वत्र रश्मिका हिच्या डीपफेक व्हिडीओची चर्चा रंगली आहे. आता याप्रकरणी पोलिसांच्या तपासातून काय पुढे येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली आहे. आयोगाने पोलिसांकडून 17 नोव्हेंबर पर्यंत एफआयआरची प्रत, आरोपींचा तपशील आणि संबंधीत प्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल मागितला आहे.

सांगायचं झालं तर, रश्मिका मंदाना हिच्या फेक व्हिडीओ प्रकरणी कोणाला अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी सध्या पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील दोषींवर कारवाई करण्यची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

रश्मिका मंदाना हिचा फेक व्हिडीओ

सांगायचं झालं तर अभिनेत्रीचा फेक व्हिडीओ डीपफेक या सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. डीपफेक हा एक प्रकारचा सिंथेटिक मीडिया आहे. यामध्ये एका व्यक्तीच्या शरीराचा वापर दुसऱ्याचा फोटो एडीट करण्यासाठी केला जातो.

रश्मिका मंदाना हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘एनिमल’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्रीसोबत अभिनेता रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.