अंबानी कुटुंबाला तर सोडाच, कार्यक्रमात डिझायनर देखील पोहोचली सोन्यात जडलेल्या ब्लाउजमध्ये
कार्यक्रमात 'या' डिझायनरने अंबानी कुटुंबातील महिलांना देखील मागे टाकलं, पोहोचली सोन्यात जडलेल्या ब्लाउजमध्ये... तिच्या ड्रेसचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...
मुंबई : जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी आणि अंबानी कुटुंबाची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. नुकताच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर उद्धाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अंबानींच्या या कार्यक्रमात फक्त बॉलिवूड नाही तर, हॉलिवूडचे देखील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अनेक मोठ्या सेलिब्रिटींमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रत्येकाने एकापेक्षा एक ग्लॅमरस कपड्यांमध्ये प्रवेश केला आणि चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. मात्र याच दरम्यान अंबानींच्या कार्यक्रमात सोन्याचा ड्रेस घातलेली एक महिला सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. त्या महिलेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
कार्यक्रमात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली महिला दुसरी तिसरी कोणी नसून ज्वेलरी डिजायनर सुहानी पारेख (Suhani Parekh) आहे. सुहानी कार्यक्रमात २४ कॅरेट सोन्याचा ड्रेस घालून पोहोचली. NMACC कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी भव्य लाँचला उपस्थित राहिलेल्या ज्वेलरी डिझायनरने २४ कॅरेट सोन्याचे बेली आर्मर घातलं होतं.
View this post on Instagram
सध्या सुहानी पारेख हिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एवढंच नाही तर, तिने यावेळी मोठ्या आत्मविश्वासाने बेबी बम्पही फ्लॉंट केला. मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधील नीताचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र सुहानीच्या ड्रेसची चर्चा जोर धरत आहे.
सुहानीच्या क्रिएटिव्ह लूकने अनेकांची नजर तिच्याकडे येवून थांबली. २४ कॅरेट सोन्याच्या बेली आर्मरमध्ये सुहानी अतिशय सुंदर दिसत होती. या ड्रेससोबत तिने कानात झुमके, नेकपीस आणि अंगठ्या घातल्या होत्या. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त सुहानी हिच्या सोन्याच्या ड्रेसची चर्चा रंगत आहे.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्धाटन सोहळासाठी परदेशातील कलाकार, धार्मिक नेते, खेळाडू आणि व्यावसायिकांनी हजेरी लावली होती. त्यांच्या उपस्थितीत NMACC चे उद्घाटन करण्यात आले. सोहळा संपला असला तरी, सोहळ्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये तुफान रंगत आहे.